Sangli APMC Election : सांगली बाजार समितीसाठी साडेआठ हजार मतदार

प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी ८ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यानंतर हरकतींवर सुनावणी होऊन २० मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
Sangli APMC Election News
Sangli APMC Election NewsAgrowon

Sangli Apmc Election : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह (Sangli Agricultural Produce Market Committee) जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची निवडणूक एप्रिलमध्ये होत आहेत. त्यांची अंतिम प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली.

सांगली बाजार समितीचे तीन तालुक्यात कार्यक्षेत्र असून, ८ हजार ६३२ मतदारांचा समावेश आहे. त्यामध्ये सोसायटी आणि ग्रामपंचायत (Grampanchyat) गटामध्ये साडेपाच हजारांवर मतदार आहेत.

तिन्ही तालुक्यांत नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना बाजार समितीसाठी मतदानाचा हक्क मिळाला आहे.

प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी ८ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यानंतर हरकतींवर सुनावणी होऊन २० मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Sangli APMC Election News
APMC Election : बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग वाढली

सहकार विभागाच्या निवडणुकांनंतर पणन मंडळाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका एकावेळी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सात बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुका अखेरच्या टप्प्यात होत आहेत.

या वेळी सहकार प्राधिकरणाकडून बाजार समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेली सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाते.

यंदा बाजार समितीमध्ये १८ संचालक निवडून जाणार आहेत. बाजार समितीमध्ये सत्ता आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जातात. मार्चमध्ये बाजार समितीची निवडणूक होत असून, सोमवारी (ता. २७) अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

सोसायटी गटातील सर्वाधिक २ हजार ८१४ मतदार, ग्रामपंचायत २ हजार ५२६, हमाल, तोलाईदार १ हजार ७६४, तर व्यापारी, अडते यांचे १ हजार ५२८ मतदार आहेत.

बाजार समितीच्या प्रारूप मतदार यादीवर २७ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. आक्षेपांवरील निर्णय ८ मार्च ते १७ मार्चपर्यंत घ्यावेत. तर, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी २० मार्चपर्यंत सुधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

Sangli APMC Election News
Akola APMC : शेतीमाल खरेदीला विलंब होत असल्याने शेतकरी आक्रमक
Sangli Bazar Samiti News
Sangli Bazar Samiti NewsSHASHANK

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com