Grape
GrapeAgrowon

पलूस येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची ९ लाखांची फसवणूक

व्यापाऱ्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पलूस, जि. सागंली ः पलूस येथील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची (Grape Farmer) दत्तात्रय पांडुरंग एडके व गणेश काशिनाथ एडके (दोघेही रा. वासुंबे, ता. तासगाव) या व्यापाऱ्यांनी ९ लाख ६ हजार ३९२ रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. याबाबत पलूस (शिवाजीनगर) येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी अमोल बाळासाहेब पवार (वय ४९) यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचे महामारीच्या कालावधीत लॉकडाउन सुरू होते. त्या वेळी द्राक्षे विक्रीची (Grape Sell) समस्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसमोर होती. याचा गैरफायदा द्राक्ष दलाल व व्यापाऱ्यांनी घेतला. अतिशय कमी दराने द्राक्षे खरेदी केली (Grape Procurement), तर काही द्राक्ष बागायतदारांचे पैसेच दिले नाहीत. अशीच फसवणूक पलूस येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी अमोल पवार व इतर शेतकऱ्यांची एप्रिल २०२० दत्तात्रय एडके व गणेश एडके यांनी द्राक्षे खरेदी केली. अमोल पवार यांच्या चार किलोच्या ४ लाख ९१ हजार ३९२ रुपये किमतीच्या ५ हजार ४६६ पेट्या खरेदी केल्या. तसेच शिवाजीनगर येथीलच इतर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची ४ लाख १५ हजार रुपयांची द्राक्षे खरेदी केली. द्राक्षाचे पैसे नंतर देतो म्हणून निघून गेले. वारंवार मागणी करूनही दोन वर्षांत पैसे दिले नाहीत.

अखेर, अमोल पवार यांनी सोमवार ता. २ रोजी स्वतःसह इतर शेतकऱ्यांची मिळून दत्तात्रय एडके व गणेश एडके यांनी मिळून ९ लाख ६ हजार ३९२ रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद पलूस पोलिस ठाण्यात दिली. गेल्याच आठवड्यात पलूस मधीलच द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची ८ लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद पलूस पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. अजूनही इतर द्राक्ष बागायतदारांचीही लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. तक्रारीसाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com