Sugarcane Crushing : सातारा जिल्ह्यात ९१ लाख टन उसाचे गाळप पूर्ण

सहकारी आठ कारखान्यांनी ३८ लाख ५६ हजार १२६ टन उसाचे गाळप करत ४३ लाख ८१ हजार १५० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon

Sugar Season : सातारा जिल्ह्यातील ऊसगाळपाचा हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करु लागला आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसगाळप होण्यासाठी कारखान्यांकडून हार्वेस्टरचा वापर वाढला आहे.

आतापर्यंत सात खासगी व आठ सहकारी साखर कारखान्यांनी (Cooperative Sugar Factories) मिळून ९१ लाख २३ हजार ३०४ टन उसाचे गाळप करून ९३ लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

१२.२३ टक्के साखर उतारा मिळवत सह्याद्री साखर कारखाना साखर उताऱ्यात अव्वल राहिला आहे. तर सर्वाधिक १६ लाख २७ हजार टन ऊस गाळप करत जरंडेश्‍वर कारखान्याने बाजी मारली आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : देशातील ६१ साखर कारखान्यांनी संपवला गाळप हंगाम

खंडाळा कारखाना बंद झाला आहे. आणखी १५ दिवसांपर्यंत हंगाम चालण्याची शक्यता आहे. या वर्षी सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र जास्त होते. हंगाम वेळेत सुरू झाल्यामुळे मार्चपर्यंतच गाळपाने कोटीच्या आकड्यांकडे वाटचाल केली आहे.

जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना मिळून सरासरी १०.१९ टक्के साखर उतारा मिळाला आहे. खासगी सात कारखान्यांनी मिळून ५२ लाख ६७ हजार १७८ टन उसाचे गाळप करून ४९ लाख १९ हजार ६७५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना सरासरी ९.३४ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

सहकारी आठ कारखान्यांनी ३८ लाख ५६ हजार १२६ टन उसाचे गाळप करत ४३ लाख ८१ हजार १५० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना सरासरी ११.३६ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

या वर्षी हंगामात जरंडेश्‍वर कारखान्याने गाळपात आघाडी घेत आतापर्यंत १६ लाख २७ हजार मेट्रिक टन ऊसगाळप केले आहे.

Sugarcane Crushing
Sugar Production : देशात २६० लाख टन साखर उत्पादन; ६१ कारखान्यांची धुराडी बंद

‘खटाव माण’चा ११.४३ टक्के उतारा

खासगी कारखान्यांमध्ये खटाव माण ॲग्रो पडळ या कारखान्याला सर्वाधिक ११.४३ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

सहकारीमध्ये कृष्णा कारखान्याने नऊ लाख ४१ हजार ३३० टन ऊसगाळप करत दहा लाख २१६० क्विंटल साखरेची निर्मिती करत आघाडी घेतली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com