‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील ९३ गावांना गावठाणाचा दर्जाच नाही

रहिवाशांना विकास आराखड्याचा लाभ होत नसल्याचे स्पष्ट
‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील ९३ गावांना गावठाणाचा दर्जाच नाही
PMRDAAgrowon

पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (PMRDA (पीएमआरडीए) हद्दीतील (PMRDA Boundry) सुमारे ९३ गावांना गावठाणाचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे या गावांमधील रहिवाशांना विकास आराखड्याचा (Development Plan ) लाभ होत नसल्याचे स्पष्ट झाले असून, या गावांना गावठाणाचा दर्जा द्यावा, अशी विनंती ‘पीएमआरडीए’ने जिल्हा प्रशासनाला केली आहे.

सुमारे आठशेहून अधिक गावांचा समावेश असलेल्या आणि एक हजार ६३८.२१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा प्रारूप विकास आराखडा ‘पीएमआरडीए’ने जाहीर केला आहे. या प्रारूप विकास आराखड्यामध्ये १८ नागरिक विकास केंद्र प्रस्तावित केली आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र विकास योजना नकाशे तयार केले आहे. या शिवाय उर्वरित ग्रामीण भागात आठ ग्रामीण विकास केंद्रे प्रस्तावित केली आहेत. या दोन्ही विकास केंद्रांतील गावे वगळता ९३ गावांना गावठाणाचा

दर्जा दिलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गावांच्या विकासाला मर्यादा आल्या आहेत. परिणामी, या गावांना विकासाच्या दृष्टीने गावठाणाचा दर्जा द्यावा, असे विनंती करणारे पत्र ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान, एखाद्याच्या गावाला गावठाणाचा दर्जा द्यावयाचा असेल, तर त्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला आहेत. लोकसंख्येच्या निकषावर तो दर्जा देण्यात येतो.

जिल्ह्यातील ९३ गावांतील नागरिकांकडून गावठाणाचा दर्जा मिळावा, यासाठी मागणी आहे. तसे पत्रही ‘पीएमआरडीए’ने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेतल्यास विकास आराखड्यात बदल करून त्या गावातील नागरिकांना न्याय देता येईल.
विशाल तांबे, नियोजन समिती सदस्य, ‘पीएमआरडीए’
गावाच्या लोकसंख्येनुसार गावठाणाचा दर्जा मिळाल्यास त्यांच्या दोनशे ते पाचशे मीटरच्या परिसरात प्रीमियम शुल्क भरून निवासी बांधकामे करता येऊ शकतात.
डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, ‘पीएमआरडीए’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com