Shahada News : कुढावदला कोरड्या नाल्यात आढळला बिबट्याचा मृतदेह

वनविभागाचे अधिकारी संजय पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Bibtya Death
Bibtya DeathAgrowon

Shahada Bibtya News : शहादा वनक्षेत्रातील कुढावद (ता. शहादा) शिवारात रस्त्याला लागूनच असलेल्या एका कोरड्या नाल्यात एक ते सव्वा वर्ष वय असलेल्या मादी जातीच्या बिबट्याचा मृतदेह (Bibtya Death) आढळून आला.

याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाहणी व पंचनामा करुन शहादा वनविभागाच्या कार्यालय परिसरात मृत बिबटचे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले.

सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु असून, शेतशिवरात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शनिवारी (ता. ४) सकाळी पावणे अकराला नेहमीप्रमाणे शेतात काम करत असलेल्या शेतमजुराला बिबट्या मृत अवस्थेत पडलेला दिसून आला.

त्यानंतर त्यांनी गावाकडे धाव घेत कुढावद येथील पोलीस पाटील भरत पाटील यांना सदरची घटना सांगितली.

Bibtya Death
Leopard Safari : जुन्नर बिबट्या सफारीसाठी अर्थसंकल्पात होणार तरतूद?

श्री. पाटील यांनी तत्काळ शहादा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. माहिती समजताच दरा वनविभागाचे अधिकारी संजय पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. यावेळी कुढावद व औरंगपूर गावातील ग्रामस्थांनी, तसेच शेतकऱ्यांनी मृत बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली होती.

वनविभागातील कर्मचाऱ्यांनी परिसराचीदेखील पाहणी केली. मात्र कोणत्याही प्रकारच्या इतर प्राण्यांच्या खुणा आढळून आल्या नाहीत.

दरम्यान, मृत बिबट मादी असून, तिचे वय अंदाजे एक ते सव्वा वर्ष असावे. प्रथमदर्शनी मृत्यू हा वय जास्त आणि शरीरात रक्त कमी असल्याने, भुकेमुळे झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, शव विच्छेदन अहवाल आल्यावर नेमके कारण समजू शकेल.

Bibtya Death
Leopard Attack : बिबट्या-मानव संघर्षातून होणारे अपघात टाळता येतात

शव विच्छेदनानंतर मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली शहाद्याचे वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे, दरा विभागाचे वनपाल एस. एम. पाटील, एस. जी. मुकाडे, वाहनचालक नईम मिर्झा, सागर निकुंभे यांनी ही कार्यवाही केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com