Mosambi Farming : मोसंबीच्या मोजक्या फळबागा शास्त्रीय पद्धतीच्या

तालुका कृषी अधिकारी घनसावंगी व फिक्स फॉर्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने लिंबी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Mosambi
MosambiAgrowon

Jalna News : मोसंबीच्या मोजक्या फळबागा (Mosambi Orchard) शास्त्रीय पद्धतीने तयार केलेला आढळतात. मोसंबी बागेचे खत, पाणी तसेच किडी व रोगाच्या नियंत्रणाचे व्यवस्थापन (Mosambi Management) फारच कमी शेतकरी करतात अशी खंत हिमायत बाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.

तालुका कृषी अधिकारी घनसावंगी व फिक्स फॉर्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने लिंबी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकरराव जाधव, सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, एस. एस. शिंदे, तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे उपस्थित होते. सुरवातीला शिवार फेरी घेऊन सतीश तौर यांच्या सीडलेस मोसंबीच्या बागेला भेट दिली.

Mosambi
Citrus Crop Pest Management : संत्रा, मोसंबी बागेतील कोळी किडीची ओळख, लक्षणे, नियंत्रण | ॲग्रोवन

विभागीय कृषी सहसंचालक डॉ. जाधव म्हणाले, की पारंपारिक आहाराला चालना देऊन सर्वसामान्यांना आरोग्य संपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

श्री शिंदे म्हणाले, की मोसंबी विक्री व्यवस्थापन यामध्ये मोसंबी फळांना ग्रेडिंग, पॅकिंग करून पुणे, मुंबई व दिल्ली या सारख्या मोठ्या बाजारपेठेत विक्री केल्यास अधिक नफा मिळतो.

श्री. रणदिवे यांनी मोसंबी फळाला प्रक्रिया करण्यासाठी तसेच दीर्घकाळ साठवणूक करण्यासाठी असलेल्या संधी विषयी व मोसंबी फळ, साल व पानांपासून मिळणारे औषधीय पदार्थ बाजारमूल्य विशद करून व्यापारी दृष्टीने उत्पादन करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी राम रोडगे तर सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर तौर यांनी केले पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही आहेत उत्पादन घटीची कारणे...

लागवडीसाठी अयोग्य कलमाची निवड, ओलितासाठी पाण्याची कमतरता, खत व पाण्याचे तसेच किडीचे व्यवस्थापन करण्याचा अभाव , मृग बहार येण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त ताण देण्याची प्रवृत्ती.

झाडावरील रोगट, वाळलेल्या फांद्या न काढणे, साल न काढण्याची वृत्ती, बागेच्या सुरवातीच्या काळात ज्वारी व कापूस इत्यादी आंतरपीक घेण्याची प्रवृत्ती तसेच रोग व किडी नियंत्रणाकडे दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे मोसंबीचे अपेक्षित चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळत नाही, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com