Maharudra Manganale Vietnam: व्हिएतनाममधलं वनीकरण बघून भारतातल्या नाटकीपणाचं हसू येतं...

मी सध्या व्हिएतनाममध्ये आहे. मनमुराद भटकायला आलोय. इथली शेतीही बारकाईने जाणून घेणार आहे. व्हिएतनाममध्ये सगळीकडे खूप झाडं दिसतात.
Vietnam Forestation
Vietnam ForestationAgrowon

Vietnam Forestation मी सध्या व्हिएतनाममध्ये आहे. मनमुराद भटकायला आलोय. इथली शेतीही (Vietnam Agriculture) बारकाईने जाणून घेणार आहे. व्हिएतनाममध्ये सगळीकडे खूप झाडं दिसतात.

तिथं बऱ्याच वर्षांपासून वृक्षारोपणाची (Tree Plantation) मोहिम नियोजनबद्ध रित्या राबवली जात असावी, असं दिसतंय. जंगलातील, रस्त्यालगतच्या झाडांकडं बघितलं की, ही लागवड टप्प्याटप्प्याने केली जातेय, हे लक्षात येतं.

झाडांच्या वाढीवरून त्यांच्या वयाचा अंदाज बांधता येऊ शकतो. एकाच पध्दतीच्या रोपांची शेकडो एकरवर ही लागवड दिसते. बहुतेक ही सरकारी लागवड असावी. रस्त्याच्या बाजुने तारेचे कुंपण आहेच. आतमध्ये झाडांना पाणी देण्याची व्यवस्था दिसते. शिवाय देखभाल करणारे लोकही.

Vietnam Forestation
Maharudra Mangnale : लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतील?

झाडं ज्या पध्दतीने सरळ वाढताहेत, याचा अर्थच त्यांची वेळोवेळी कटींग केली जातेय. रस्त्याच्या बाजूने सगळीकडं या झाडांची घनदाट जंगलं निर्माण केली जात आहेत.

हे वनीकरण बघितलं आणि भारतातील वनीकरणाचं नाटक बघितलं की, आपल्याला हसू आल्याशिवाय राहात नाही. व्हिएतनाममधल्या वनीकरणाच्या कामातील गुणवत्ता ठळकपणे डोळ्यात भरते. झाडं जगवायचं, नीट जोपासायचं व्यवस्थित नियोजन दिसतं.

काल येताना रस्त्याच्या कडेने (पदपथावर ठराविक अंतरावर) लावलेली झाडं बघितली. ती झाडं सरळ वाढावीत म्हणून त्याला तिन्ही बाजूंनी मजबूत लाकडांचे टेकू देण्यात आलेत. शिवाय पाणी देण्यासाठी एक तोटीही आहे. एवढी काळजी घेतल्यावर ते झाड नीट येणारच.

Vietnam Forestation
Maharudra Mangnale: उन्हाळ्यातली पानझड

इथं सार्वजनिक मालमत्तेला हात लावण्याची, नुकसान करण्याची कोणाची हिंमत होत नसावी किंवा तशी वृत्तीच नसावी. आपल्या देशात काय परिस्थिती आहे, यावर मी वेगळं भाष्य करण्याची गरज नाही.

अर्थात आपल्याकडं बहुतांश भागात पाण्याची बोंब आहे. पण त्याहीपेक्षा वानवा आहे ती इच्छाशक्तीची. कुठल्याच कामात उत्स्फूर्तता नाही. सगळा बिगारीपणा आणि दिखावूपणा.

जिथं मुबलक पाणी आहे, तिथं तरी कुठं चांगल्या प्रकारे जंगल वाढलेलं दिसतंय? आपल्या लोकांच्या फक्त तोंडात राष्ट्रवाद, धर्मवाद, मानवतावाद आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी...हे फक्त ऐकायचं. कृती नेमकी उलटी. त्यामुळं बकालपणा आणि भकासपणा वाढतच चाललाय.

(लेखक लातूर येथील शेतकरी व पत्रकार आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com