Agrowon Agricultural Exhibition 2023 : मराठवड्यातील कोरडवाहूतला आशादायी स्पार्क

शेतीमध्ये जीव लावा, समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीशिवाय भविष्य नाही, हे लक्षात घ्या. टाईमपास शेतकरी निवडू नका, नाहीतर आपलाच वेळ वाया जाणार.
Agrowon Agricultural Exhibition 2023
Agrowon Agricultural Exhibition 2023Agrowon

ऍग्रोवन प्रदर्शनात (Agrowon Agricultural Exhibition) दरवर्षी किमान दोन नवीन स्पार्क भेटतात आणि नवी दिशा देऊन जातात. सगळीकडे शेतीमध्ये हे होत नाही, ते होत नाही, असे वातावरण निर्माण करणाऱ्या लोकांपेक्षा असे स्पार्क भेटले की, आपली दिशा योग्य आहे, हे कळते, मन कणखर बनते.

अडचणी येणार, लोक बोंबलणार, पण असे स्पार्क डोळ्यासमोर आले की, आपण का करू शकत नाही, हा प्रश्न एक मन विचारतेच..

"आज माझ्याकडे युवा आयटी इंजिनिअर, मेकॅनिकल इंजिनिअर, शहरातील युवक रेशीम शेती शिकवा म्हणून रोज फोन करतात, शेतीवर येऊन रहायला तयार आहेत.

मी या म्हणतो, पण शेतात रहावं लागेल.. माझं तरुण पिढीला एक सांगणं आहे की, बांधावरील शेतकरी होऊ नका, बस स्टँड वरचा शेतकरी तर नकोच, शेतीमध्ये कुटुंबातील ७० टक्के लोक रोज सकाळी ७ ला हजर झाले पाहिजेत.

मनाची तयारी ठेवा, तरच यशस्वी व्हाल.जो मजुरांवर अवलंबून राहिला, त्याचा "कार्यक्रम" झालाच म्हणून समजा...

शेतीमध्ये जीव लावा, समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीशिवाय भविष्य नाही, हे लक्षात घ्या. टाईमपास शेतकरी निवडू नका, नाहीतर आपलाच वेळ वाया जाणार.

Agrowon Agricultural Exhibition 2023
Reshim Udyog: शेतकरी नियोजन - रेशीम शेती

कोरडवाहू शेती देखील शाश्वत होते, रेशीम शेतीने मला लाख रुपये दाखविले आहेत."... हे बोल आहेत मचिंद्र चिंचोली(जि. जालना) येथील भाऊसाहेब निवदे या २६ वर्षीय युवा शेतकऱ्यांचे.

गेली ५ वर्षे ५ एकरवर रेशीम शेती करणाऱ्या भाऊसाहेबाने १६ महिन्यात कोष विक्रीतून २३ लाखाची उलाढाल केली आहे. वडील, भाऊ, आई आणि तो शेतीत राबतो.

गरज असेल तर मजूर... रेशीम शेतीला सुरवात करताना गावकऱ्यांनी त्याला येड्यात काढलं होतं, आज त्याच्या रेशीम कोष विक्रीच्या पावत्या पाहिल्यावर गाव येडं झालंय...

दुसरा स्पार्क म्हणजे रामेश्वर गायके, भातोडी (जि. जालना) शिवारातील शेतकरी. धडधाकट शेतकरी मरगळलेल्या अवस्थेत असताना रामभाऊ कुबड्यांच्या ताकदीवर आठ एकर शेती सांभाळत आहे.

द्राक्ष, भाजीपाला, शेडनेट मधील भाजीपाला आणि कलिंगड, खरबूज बीजोत्पादनातील मास्टर शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.

Agrowon Agricultural Exhibition 2023
Reshim Udyog: रेशीम शेतीतून संघर्षमय जीवनाला आला ‘अर्थ’

रामभाऊ म्हणतात, माझ्या कुबड्या पाहून लोक भावनिक होतात, हा कसली शेती करतोय. पण मी कणखर आहे, यातील एक कुबडी शेती तंत्रज्ञान आणि ही दुसरी कुबडी मानसिक कणखरपणा आहे, हे दोन असेल तर तुमची शेती पळणार, अपंग राहणार नाही..

काही दिवसात या दोन स्पार्क लोकांच्या शेतीवर जाऊन खरं शास्त्र शिकावं लागणार आणि आपल्या शेतीमध्ये रुजवात करावी लागणार, हे आमचं ठरलंय...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com