Crop Protection : ...आता मोकाट प्राणी शेतात शिरताच मोबाईलवर येईल एसएमएस

उत्तरप्रदेश गोरखपूर येथील बुद्ध इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक यंत्र तयार केले आहे.
Crop Protection
Crop ProtectionAgrowon

बदलते हवामान, कीड रोगामुळे शेतीपिकांच होणार नुकसान (Crop Damage) मोठं आहे. याशिवाय मोकाट जनावरे आणि वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीलाही शेतकऱ्यांना सामोर जावं लागत.  यावर वेगवेगळे उपाय योजले जात असले तरी ते फारसे प्रभावी ठरत नाहीत.

शेतकऱ्यांची ही समस्या समजून घेऊन उत्तरप्रदेश गोरखपूर येथील बुद्ध इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ( Electronics and Communication of Buddha Institute of Technology) विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक यंत्र तयार केले आहे.

ज्यामुळे शेतात प्राणी शिरताच हुटर वाजेल त्यामुळे काही क्षणात मोबाईल एसएसएसद्वारा त्याची माहिती शेतकऱ्याला मीळेल. जेणेकरुन होणारे नुकसान टाळणं शक्य होईल. 

बुद्धा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी हर्ष कुमार मिश्रा, शिवम कुमार चौरसिया, आदित्य कसोधन आणि अनिल कुमार चौधरी या विद्र्यार्थ्यांनी हे यंत्र डिझाइन केले आहे. हे यंत्र'इंटरनेट ऑफ थिंग्ज'वर आधारित असून विद्यार्थ्यांनी ते एका महिन्यातच तयार केले आहे.

या यंत्राला आयओटी क्रॉप प्रोटेक्टर असे नाव देण्यात आले आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या यंत्रामुळे शेतात मोकाट जनावरांमुळे होणारे पिकांचे नुकसान वाचण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

Crop Protection
Mumbai News : मोकाट जनावरांच्या मालकांना आता दंड

आयओटी क्रॉप प्रोटेक्टर कसं काम करते?

आयओटी क्रॉप प्रोटेक्टरमध्ये वायफाय मॉड्यूल आहे जे २४ तास इंटरनेटशी जोडले जाईल. या यंत्रामध्ये एक सिम इन्स्टॉल करण्यात आले आहे जे हॉटस्पॉट तयार करेल आणि या प्रोटोटाइपमधील सर्व डिव्हाइस एकत्र कनेक्ट करेल.  

या आयओटी क्रॉप प्रोटेक्टर वर सोलर पॅनल बसविण्यात आले असून, यामुळे या उपकरणाला पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होणार आहे. यंत्रामध्ये वाइड रेंज कॅमेरा आहे ज्यात नाईट व्हिजन देखील आहे.

त्यामुळे या कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये कोणताही प्राणी आला की या यंत्रामध्ये लावलेला डिटेक्टर त्याचा शोध घेईल, जेणेकरून यंत्रातील हूटर आपोआप वाजायला सुरुवात होईल.आजूबाजूला कोणतेही जनावर असल्यास दुसऱ्याच क्षणी शेतकऱ्याच्या मोबाइलवर हे यंत्र एसएमएस अलर्ट पाठवेल.

त्यामुळे शेतकऱ्याला शेतात मोकाट जनावर शिरल्याची माहिती मिळेल. हे यंत्र सुमारे पाचशे मीटर अंतराच्या कक्षेत काम करेल. अती तापमान, पाऊस तसेच वाऱ्याचा या यंत्रावर परिणाम होणार नाही. 

Crop Protection
सांगा आता शेतात माती कुठून आणू?’

या यंत्राची दोन महिने चाचणी घेण्यात आली. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्या नंतरच हे यंत्र लाँच करण्यात आले आहे. या यंत्रामध्ये असे प्रोग्रामिंग आहे जेणेकरून ते शेतकऱ्यांपर्यंत माहिती किंवा अलर्ट पोहोचवू शकेल.

या यंत्रात शेतातील ओलावा मोजण्यासाठी आर्द्रतामापक ही बसविण्यात आले आहे. त्यामुळे शेतातील आर्द्रता घरबसल्या मोबाईलवर जाणून घेता येते.

यंत्र बनवण्यासाठी किती खर्च आला?

या उपकरणात बसविण्यात आलेली सर्व उपकरणे अत्यंत अत्याधुनिक आणि हायटेक असल्याने या उपकरणाचा प्रोटोटाइप तयार करण्यासाठी सुमारे ५० हजार रुपये खर्च आला आहे, अशी माहिती या प्रकल्पाशी संबंधित विद्यार्थी आदित्य कसोधन यांनी दिली.

त्यामुळे खर्च थोडा जास्त असला तरी त्याचे परिणाम अतिशय परिणामकारक ठरत आहेत. असे केल्यास शेतकरी मोकाट जनावरांपासून आपल्या शेताचे संरक्षण करू शकतील.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com