सोरटेवाडीच्या केंजळे कुटुंबाने जपला सासवडच्या सोपानकाका पालखी बैलजोडीचा मान

चौथ्या पिढीचाही उस्फूर्त प्रतिसाद
सोरटेवाडीच्या केंजळे कुटुंबाने जपला
सासवडच्या सोपानकाका पालखी बैलजोडीचा मान
Sopankaka PalkhiAgrowon

बारामती : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबाला संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान आहे. यंदाही केंजळे कटुंबाकडून परंपरेला खंड पडू न देता सोहळ्यासाठी बैलजोडी पाठविण्यात आली. दर वर्षी केंजळे कुटुंब या सोहळ्यासाठी उत्साहात बैलजोडी पाठवतात.

शनिवारी (ता. १८) सोरटेवाडी (ता बारामती) येथील केंजळे वाड्यात बैलजीडीची पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आली. या वेळी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, राष्ट्रवादी बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते पूजा पार पडली. या वेळी सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, माजी संचालक विशाल गायकवाड, ज्येष्ठ विजयकुमार सोरटे, मधुकर सोरटे, आत्माराम सोरटे, सोरटेवाडीचे सरपंच दत्तात्रेय शेंडकर, करंजेपूलचे सरपंच वैभव गायकवाड, विजय राजवडे, विठ्ठल गायकवाड, श्रीपाल सोरटे, सोमनाथ सोरटे, माणिक लकडे, होळ माजी सरपंच ओकार होळकर, नंदकुमार मोकाशी, हनुमंत शेंडकर, तसेच केंजळे कुटुंबातील ज्ञानेश्वर केंजळे, विकास केंजळे, संकेत केंजळे यांच्यासह सोमेश्वर पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

केंजळे कुटुंबातील कै. बापूसाहेब बाळाजी केंजळे हे सोपानकाकांच्या समाधीचे सेवेकरी होते. त्यांच्याकडे बैलजोडी पाठविण्याचा असलेला मान आजही केंजळे कुटुंबाने जपला आहे. दर वर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने ही बैलजोडी सासवडकडे पाठविण्यात आली. परंपरेने शनिवारी (ता. २५) दुपारी १ वाजता रोजी संत सोपानदेव महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com