Soldier Land : सैनिकाची जमीन आणि कूळ

सैनिकाच्या जमिनीला कूळ लागत नाही. ही कूळ कायद्यातील तरतूद माणिकरावला मामलेदारांनी सांगितल्यावर माणिकरावचा नाइलाज झाला.
Agriculture Land
Agriculture LandAgrowon

Agriculture Act : गावात चंद्रकांत नावाच्या एका सैनिकाची जमीन होती. चंद्रकांत सैनिक असल्याने नोकरी निमित्ताने तो जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये कार्यरत होता. चंद्रकांतच्या सांगण्यानुसार गावातीलच त्याचा नातेवाईक शेतकरी माणिकराव जमीन कसत होता.

तीन ते चार वर्षे गेल्यानंतर माणिकरावच्या मनात वाईट विचार आला की, ही जमीन आपण इतक्या वर्षांपासून कसतो म्हणजे या जमिनीचा कूळ मीच व्हायला पाहिजे.

थोड्याच दिवसांत गावातील पुढाऱ्यांना हाताशी धरून चंद्रकांतच्या जमिनीला मी कूळ आहे असा अर्ज त्याने केला. चंद्रकांतला कोणत्याही प्रकारची माहिती न होऊ देता किंवा कोणतीही नोटीस न देता माणिकरावने गुपचूप त्या जमिनीचा मालक होण्याचा प्रयत्न केला.

त्यासाठी माणिकरावने फार धडपड केली. माणिकरावने गावातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे जाब-जबाब व प्रतिज्ञापत्रे स्वतःच्या बाजूने लिहून घेतली.

Agriculture Land
Land Acquisition : ‘एमआयडीसी’ला जागा देण्यास नवापुरातील शेतकऱ्यांचा विरोध

माणिकरावने गावातील लोकांना सांगितले की, "तुम्ही तर बघताच की मीच ही जमीन अनेक वर्षापासून कसतोय. त्यामुळे तुम्ही लोकांनी खरी परिस्थिती प्रतिज्ञापत्रावर दिली तर माझ्यावर फार उपकार होतील.’’ गावातल्या लोकांनी सुद्धा माणिकरावची एवढी तळमळ बघून प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या.

पुढच्या तारखेला प्रतिज्ञापत्रे व इतर काही कागदपत्रे असे पुरावे माणिकरावने तहसील कार्यालयात सादर केले. माणिकरावच्या कागदपत्रांची छाननी तहसीलदारांनी केली.

तहसीलदारांनी माणिकरावला सांगितले की, सैनिकाच्या जमिनीला कूळ लागत नाही. ही कूळ कायद्यातील तरतूद माणिकरावला मामलेदारांनी सांगितल्यावर माणिकरावचा नाइलाज झाला.

प्रामाणिक चंद्रकांतला फसविण्याचा माणिकरावचा वाईट हेतू सगळ्या गावकऱ्यांच्या निदर्शनास आला.

Agriculture Land
Land Survey : ई-मोजणी क्रांतिकारीच!

सैनिकांच्या जमिनीला कुळकायद्यानुसार कोणताही कूळ लागू शकत नाही. सैनिक हा नोकरीत नेहमीच गावाच्या बाहेर असणार हे विचारात घेऊनच कूळ कायद्यात अपवाद करून सैनिकाच्या जमिनीला कूळ लागू शकणार नाही, अशी तरतूद केली आहे.

कूळ कायद्याबाबत माहिती नसेल तर वाईट मार्गाने स्वार्थासाठी केलेली धडपड अंगाशी येऊ शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com