Seed Bank : मगन संग्रहालयाने उभारणी अनोखी बियाणे बॅंक

शेतकऱ्यांमध्ये बियाणे स्वावलंबन रुजावे त्यासोबतच त्यांचा दरवर्षीचा बियाण्यांवरील खर्च कमी व्हावा या उद्देशाने मगन संग्रहालयाने बीज बॅंकेची अभिनव संकल्पना मांडली आहे.
Seed Bank
Seed BankAgrowon

वर्धा ः शेतकऱ्यांमध्ये बियाणे स्वावलंबन (Seed Self Sufficient) रुजावे त्यासोबतच त्यांचा दरवर्षीचा बियाण्यांवरील खर्च (Seed Expenditure) कमी व्हावा या उद्देशाने मगन संग्रहालयाने (Magan Museum) बीज बॅंकेची (Seed Bank) अभिनव संकल्पना मांडली आहे. समुद्रपूर तालुक्‍यातील गिरड येथे या बीज बॅंकेचे काम पूर्णत्वास गेले असून, तब्बल ८८ प्रकारच्या देशी बियाण्यांचे संवर्धन केले जाणार आहे.

ग्राम उद्योगावर आधारित उद्योगांना बळ देण्याचे काम मगन संग्रहालयाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामध्ये चरख्यावर सूतकताईपासून धागा तयार करणे व हातमागावर कापड निर्मिती अशा घटकांचा समावेश आहे. खादीच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून ग्रामीण रोजगाराचा उद्देश साधला जावा अशी संकल्पना त्यामागे आहे.

Seed Bank
Seed Storage : बियाण्याची साठवणूक करताना या बाबी लक्षात घ्या

आता याच उद्देशपूर्तीसाठी सरसावलेल्या मगन संग्रहालय समितीने ग्रामीण भागात दर हंगामात बियाण्यांवर होणारा अनावश्‍यक खर्च कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गिरड येथे बियाणे बॅंकेची उभारणी केली आहे. तब्बल ८८ प्रकारच्या देशी बियाण्यांचे संवर्धन या बॅंकेच्या माध्यमातून करण्यावर भर देण्यात आला आहे.

बियाणे बॅंकेच्या उभारणीपूर्वी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात आले. तीनदिवसीय शिबिराचे आयोजन त्यासाठी करण्यात येत होते. या माध्यमातून गेल्या दीड दशकात १५ हजार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. नैसर्गिक शेतीत बियाण्यांची गरज भासत असल्याने देशी बीज संवर्धन अभियान २०१० पासून हाती घेण्यात आले.

Seed Bank
Seed : उत्सव पारंपरिक बियाण्यांचा

शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेण्यात आले. त्यासोबतच बीज यात्रा काढण्यात आली. या अभियानात सुमारे २१ गावांचा समावेश होता. या गावात बीज संवर्धक आणि बीजमाता या संकल्पनेअंतर्गत कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात आली. सद्यःस्थिती ३० बीज संवर्धक या केंद्राशी जुळलेले आहेत. समुद्रपूर तालुक्‍यात उपलब्ध होणारे ८८ प्रकारचे देशी बियाणे या माध्यमातून संकलित करण्यात आले. बीजोत्पादनातून बियाणे वाढ करून त्याचा प्रसार केला जाईल.

उभारली इमारत

मगन संग्रहालय समितीच्या या बीज बॅंकेने अनेक वैशिष्ट्य जपली आहेत. त्यामध्ये बीज बॅंकेकरिता उभारण्यात आलेली इमारतीचे बांधकाम हे मातीचे आहे. त्यामुळे नैसर्गिक थंडावा राहतो सोबतच बियाणे साठवणुकीसाठी मातीची मडकी, माठ यांचा वापर करण्यात आला आहे. याप्रमाणे पारंपरिक साधनांचा उपयोग या ठिकाणी करण्यात आला आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मोठे षड्‍यंत्र

देशी बियाण्याचे संवर्धन केले नाही तर दरवर्षी जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे निर्मित महागडे बियाणे खरेदीची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. त्यामुळे बीज स्वराज्य ही संकल्पना मांडत बीज बॅंकेची उभारणी केली आहे. संस्थेशी संलग्न शेतकऱ्यांकडे देशी बियाणे उपलब्ध आहे. त्याचा पुरवठा इतर शेतकऱ्यांना केला जाईल. सध्या ८८ प्रकारचे बियाणे कमी प्रमाणात आहे.

येत्या काही वर्षांत बियाणे उपलब्धता व बियाणे प्रकारात वाढ होईल. त्यामुळेच या संकल्पनेला बियाणे बॅंक असे नाव दिले आहे. जनुकीय बियाण्यांची उत्पादकता आधी फुगवून सांगण्यात आली आता नवे तंत्रज्ञान थोपविण्यासाठी पूर्वीच्या तंत्रज्ञानाची परिणामकारकता कमी झाल्याचा कांगावा होत आहे, हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मोठे षडयंत्र आहे, असे मगन संग्रहालय समितीच्या अध्यक्षडॉ. विभा गुप्ता यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com