डोंगरात खोदली विहीर; पण वीज काही मिळेना

पाणी नसल्यामुळे शेती (Farming) परवडत नाही. पावसाळ्याची भातशेती (Paddy) सोडता इतर पिके घेण्याची आम्हाला संधीच नाही.
Power Supply
Power SupplyAgrowon

पुणेः पारंपरिक भातशेतीऐवजी (Paddy) फळबागा (Horticulture) उभारून समृद्धीची स्वप्नं बघणाऱ्या दोन शेतकरीपुत्रांनी सह्याद्री पर्वतरागांमधील एका डोंगरावर मोठी विहीर (Well) खोदली आहे. मात्र, त्यांना कृषिपंपासाठी विद्युत पुरवठा देण्यास नकार देण्यात आला आहे.

सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीतील शेतकरी सह्याद्रीप्रमाणेच चिवट आणि संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाणारा. वेल्हे शिवारातील तोरणागडाच्या घेऱ्यात पायथ्यापासून गडाकडे जाणाऱ्या डोंगरावर शेतकरी दिनकर गायकवाड व हिराबाई गायकवाड वर्षांनुवर्षे पारंपरिक शेतीत राबत आहेत. त्यांची रविराज व युवराज ही दोन जिद्दी मुले.

त्यांनी डोंगरावर फळबागा उभारण्यासाठी खोदलेल्या विहिरीची चर्चा गावभर झाली; पण वीजजोडणी नाकारल्यामुळे पंचक्रोशीत संताप व्यक्त केला जातोय. बारावी शिकलेला रविराज वडिलांना शेतीत मदत करून जीप चालवतो. त्याने कर्ज काढून जीप घेतली आहे. पदवीधर युवराजने गावात तात्पुरती नोकरी स्वीकारली आहे. नोकरी सांभाळून युवराजदेखील शेतीला मदत करतो.

“पाणी नसल्यामुळे शेती परवडत नाही. पावसाळ्याची भातशेती सोडता इतर पिके घेण्याची आम्हाला संधीच नाही. जीप चालवून मी उदरनिर्वाह करतो आणि त्यातील पैसा उलटा शेतीला भांडवल म्हणून पुरवतो.

कोरोना कालावधीत सर्व काही ठप्प होते. पण, आम्ही दोघे भाऊ स्वस्थ बसलो नाही. शेतीही केली आणि खोदाई मजूर शोधून आम्ही विहीरदेखील खोदून घेतली. पाच लाख रुपये खर्च झाले; पण राज्य शासनाने अडीच लाखाचे अनुदान दिल्यामुळे कर्ज काढण्याची वेळ आली नाही,” असे युवराजने सांगितले.

मजुरांनी अवघे ५० हजार रुपये आगाऊ घेतले आणि विहीर खोदून दिली. त्यानंतर अनेक दिवसांनी पैसे जमवून फलटणच्या या मजुरांना दोन लाख रुपये ऑनलाइन पेमेंट सुविधेद्वारे पाठविले. यातून मजूर मंडळी शेतकऱ्यांना कशी मदत करतात, हे दिसून आले. मात्र, महावितरणची भूमिका मदतीऐवजी मनोधैर्य खचविणारी आहे.

रविराज गायकवाड म्हणाले, “ तोरणागडाच्या घेऱ्यात इतक्या उंचीवर खोदलेली ४७ फूट उंचीची ही पहिलीच विहीर आहे. विहिरीला भरपूर पाणी लागल्यामुळे आम्ही फळबाग लागवडीचे नियोजन केले होते. केशर आंब्याची २०० झाडे लावली. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अर्ज करूनही वीजजोडणी दिली नाही. त्यामुळे फळबागेची वाढ झाली नाही. काही झाडे जळून गेली. मी महावितरणकडे पाठपुरावा करून थकलो आहे.”

समोर रोहित्र; मात्र जोडणी नाही

युवराज यांच्या पत्नी रेश्मा आणि वहिनी अर्चनादेखील शेतीत राबतात. मात्र, गायकवाड परिवाराला भातशेती (Paddy) परवडत नाही. दीड एकरातून दहा पोते भात निघतो. इतर सर्व शेतकऱ्यांची घरे गावात आहेत. गायकवाड बंधूंनी या डोंगरावर घर बांधले आहे.

Power Supply
निवडुंगाच्या जैविक कुंपणाने वन्यजीवांपासून पीक संरक्षण

कारण वन्यपशूंकडून शेतमालाचे होणारे नुकसान थोडे कमी व्हावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे दोघा भावांनी सरकारी रस्त्यासाठी जागा दिली; रस्तावर वीजेचे खांब असून रोहित्रदेखील आहे. “आमच्या डोळ्यासमोर वीजेचे खांब आहेत. मात्र, कृषिपंपासाठी वीज पुरवठा करण्यास महावितरण तयार नाही. अशा भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे दारिद्र्य कसे हटेल,” असा सवाल शेतकरी रविराज यांनी उपस्थित केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com