Delhi Election : दिल्ली महानगरपालिकेत 'आप'चा विजय; भाजपला बसला झटका

दिल्ली महानगरपालिकेवर आम आदमी पक्षाने एक हाती सत्ता मिळवत भाजपला धूळ चारली. दिल्ली महानगरपालिकेच्या २५० पैकी २४० जागेचे निकाल हाती आले आहेत.
Arvind Kejariwal
Arvind KejariwalDelhi Election

दिल्ली महानगरपालिकेवर (MCD) आम आदमी पक्षाने (Aam Adami Party) एक हाती सत्ता मिळवत भाजपला (BJP) धूळ चारली. दिल्ली महानगरपालिकेच्या २५० पैकी २४० जागेचे निकाल हाती आले आहेत. स्पष्ट बहुमतासाठी १२६ जागांची आवश्यकता आहे. मात्र आम आदमी पक्षाने १३४ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर भाजपने १०४ जागावर विजय मिळवला आहे.

दिल्ली महानगरपालिका मागील १५ वर्षांपासून भाजपच्या हाती होती. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली होती. त्यानंतर तीन वाजता २४० जागेवरचे निकाल हाती आले. त्यावेळी आपने १३४ जागेवर विजय मिळवला होता.

Arvind Kejariwal
Crop Insurance : साडेचार लाख दावेदारांना विमा भरपाईची प्रतीक्षा

विजयानंतर आपच्या दिल्लीतील कार्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, "लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा प्रयत्न करू. दिल्लीचा विकास करण्यासाठी इतर पक्षांनाही एकत्र यायला सांगू."

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपने शेवटपर्यंत टक्कर दिली. मात्र विजयासाठी आवश्यक असणाऱ्या १२६ जागांवर भाजपला विजय मिळवता आला नाही. मात्र या निवडणुकीमध्ये कॉँग्रेसला केवळ ९ जागेवर विजय मिळवता आला.

२५० जागांसाठी एकूण १३४९ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. २०१७ मध्ये भाजपने १८१ जागावर जिंकल्या होत्या. त्यावेळी आपला केवळ ४८ आणि कॉँग्रेसला ३० जागा मिळवता आल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com