Shahada Market Committee : शहादा बाजार समिती सभापतिपदी अभिजित पाटील

Shahada Market Committee Update : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील यांची आणि उपसभापतिपदी डॉ. सुरेश नाईक यांची बिनविरोध निवड झाली.
Shahada Apmc Election
Shahada Apmc ElectionAgrowon

Market Committee Shahada News : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील यांची आणि उपसभापतिपदी डॉ. सुरेश नाईक यांची बिनविरोध निवड झाली.

दोघांचा प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नीरज चौधरी यांनी ही निवड जाहीर केली. सत्तर वर्षांच्या इतिहासात प्रथमच आदिवासी समाजाला उपसभापती बनण्याचा बहुमान देण्यात आला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया झाली. नवनिर्वाचित संचालक शिलाबाई पाटील, हर्षदा पाटील, सत्यानंद पाटील, कांतीगिर बाबा, जगदीश पाटील, दिलीप चौधरी, भानुदास पाटील, शिवाजी पाटील, विलास पाटील, मयूर पाटील, मोहनसिंग गिरासे, रवींद्र पाटील, सुरेश नाईक, शांतिलाल आहेर, मोतीलाल जैन, रूपेश जैन, जीवन भिल आदी संचालक उपस्थित होते.

सर्वानुमते सभापतिपदासाठी अभिजित पाटील तर उपसभापतिपदासाठी डॉ. सुरेश नाईक यांचे नाव जाहीर करण्यात आले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घनश्याम बागल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांनी निवडणूककामी सहकार्य केले.

Shahada Apmc Election
Glader's Disease : घोड्यांमधील ‘ग्लैंडर्स’ रोगामुळे शहादा तालुक्यात निर्बंध

नूतन सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अभिजित पाटील यांच्या गंगोत्री निवासस्थानीदेखील जल्लोष करण्यात आला.

देव मोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार गावित, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पटेल, शहादा तालुका एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील, संचालक जयदेव पाटील, हिरालाल पाटील, दत्तू पाटील, दिलीप गांगुर्डे, तालुका एज्युकेशन संस्थेचे संचालक हरी पाटील, संतोष वाल्हे, लोटन धोबी, अजित बाफना, आनंदा पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

आजोबांनंतर नातू...

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९५० ला झाली होती. पहिले सभापती म्हणून डॉ. विश्राम हरी पाटील यांची निवड झाली. यानंतर १९५६ ते ५७ दरम्यान विद्यमान नवनिर्वाचित सभापती अभिजित पाटील यांचे आजोबा (स्व.) फकीरा जयराम पाटील हे प्रभारी सभापती होते.

१९५७ ते २०२३ पर्यंत (स्व.) पी. के. पाटील गटाचे वर्चस्व राहिले. या बाजार समितीत परिवर्तन झाले पाहिजे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील यांनी शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com