Fertilizer Prices : खरिपासाठी देशात मुबलक खते उपलब्ध : मंडाविया

देशातील नॅनो युरिया उत्पादन ७ कोटी बाॅटल्सपर्यंत पोचले. नोव्हेंबर २०२५ पर्यंत उत्पादनाची क्षमता ४४ कोटी बाॅटल्सपर्यंत वाढेल.
Fertilizer
Fertilizer Agrowon

New Delhi : यंदा देशात युरिया मुबलक साठा (Urea Stock) असेल. खरिपासाठी १८० लाख टन युरिया लागतो. तर शिल्लक साठा आणि उत्पादन मिळून देसआत १९४ लाख टनांचा पुरवठा असेल.

त्यामुळे भारताला यंदा अनेक दशकानंतर युरिया आयात करण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मनसुख मंडाविया यांनी संसदेत दिली. पण पोटॅशचा मोठा तुटवडा असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

मंत्री मंडाविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात यंदा युरिया आणि संयुक्त खते आयात करण्याची गरज नाही. पण पोटॅशची सध्याची देशातील उपलब्धता खूपच कमी आहे. भारत पोटॅशासाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे.

भारताने एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात युरिया आयात दीड टक्क्याने अधिक केली. भारताने या काळात ७३ लाख टन आयात केली. तर युरियाची विक्री ७.३ टक्क्यांनी वाढून ३१८ लाख टनांवर पोचील.

Fertilizer
Bogas Fertilizer : बोगस खत कंपन्यांवर कृषी विभागाचा वरदहस्त? कृषिमंत्री सत्तारांचा उडला गोंधळ

मागील हंगामात युरिया शिल्लक साठा खुपच कमी होता. तर या काळात देशातील युरियाचे उत्पादन जवळपास १३ टक्क्यांनी वाढून २३७ लाख टनांवर पोचले. एप्रिल २०२३ मध्ये शिल्लक युरियाचा साठा ५५ लाख टन असेल. तर उत्पादन १३९ लाख टन होईल.

खरिपाची गरज पूर्ण करण्यासाठी भारताला डीएपीची काही आयात करावी लागू शकते, असेही मंडाविया यांनी सांगितले. परंतु त्यांनी पोटॅशच्या मद्द्यावर बोलण्यास नकार दिला. सरकार खरिपासाठी खतांची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोटॅशचा कमी साठा

देशाच खत वर्ष १ एप्रिलपासून सुरु होईल. तर देशात खरिपासाठी खतांची मुबलक उपलब्धता असल्याचं मंत्री मांडविया यांनी सांगितले. देशात डीएपीचा शिल्लक साठा २५ लाख टन असेल, तर उत्पादन २० लाख टन होईल, अशी एकूण ४५ लाख टनांची उपलब्धता असेल.

तर खरिपात डीएपीची मागणी ५९ लाख टनांची असेल. संयुक्त खतांची मागणी ६४ लाख टन असेल तर उपलब्धता ७७ लाख टनांच्या दरम्यान असेल.

खरिपासाठी पोटॅशची आवश्यकता २० लाख टन असेल. त्यातुलनेत देशात केवळ ४० हजार टनांची उपलब्धता असेल, असेही मंडाविया यांनी स्पष्ट केले.

Fertilizer
Fertilizer sales center : भंडाऱ्यातील १२ कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित

नॅनो युरिया उत्पादन वाढले

देशातील नॅनो युरिया उत्पादन ७ कोटी बाॅटल्सपर्यंत पोचले. नोव्हेंबर २०२५ पर्यंत उत्पादनाची क्षमता ४४ कोटी बाॅटल्सपर्यंत वाढेल. या उत्पादनाची क्षमता २०० लाख टन युरियाएवढी असेल. सध्याची युरिया उत्पादन क्षमता २६० लाख टनांपर्यंत वाढली.

तर २०२५ पर्यंत देशातील एकूण युरिया उत्पादनाची क्षमता ४६० लाख क्विंटलपर्यंत वाढेल. सध्या देशाची युरियाची मागणी ३६० लाख टन आहे. म्हणजेच पुढील काळात मागणीच्या तुलनेत युरिया उत्पादनात मोठी वाढ होईल, असेही मंडाविया यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com