भात रोपवाटिकेच्या कामांना वेग

पश्‍चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भात पिकांची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यांत सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात.
भात रोपवाटिकेच्या कामांना वेग
Paddy CultivationAgrowon

पुणेः सध्या जिल्ह्यातील अनेक भागांत पूर्वमोसमीच्या सरी पडत आहे. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्यात भात रोपवाटिकेची कामे सुरू झाली आहेत. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास वेळेवर पेरण्या होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात खरिपाची दोन लाख पाच हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पश्‍चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भात पिकांची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यांत सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात. यंदा चांगल्या पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून खरिपाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठाचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या केंद्रातून निविष्ठा नाममात्र दरात उपलब्ध होणार आहे.

पश्‍चिम पट्ट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहणार आहे. त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणारी रोपवाटिका यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शेतकरी घेत असून, रोपवाटिकेची कामे सुरू केली आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेत भात बियाणे टाकण्याचे कामे सुरू झाली आहेत. पूर्वेकडील भागातही मशागतीची कामे सुरू आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी ऊस लागवडीची पूर्वतयारी शेतकरी करत आहेत.

याविषयी मावळ तालुक्यातील चांदखेड येथील नितीन गायकवाड म्हणाले, की गेल्या आठवड्यात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे भात रोपवाटिकेच्या कामांना सुरुवात केली आहे. सध्या माझ्याकडे एकूण साडेआठ एकर शेती आहे. त्यात एक एकर फळबाग आहे. खरिपात भाताची अडीच एकरावर लागवड करणार आहे. मशागतीची कामे सुरू आहेत. भात रोपे तयार करण्याचे कामे सुरू आहेत. गेल्या एक ते दोन दिवसापासून काही भागात पूर्वमोसमी पाऊस आहे.

दृष्टिक्षेपात

भाताचे सरासरी क्षेत्र - ५७,९६४ हेक्टर

गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेली भात पेरणी -- ६०,१३७

यंदा भात लागवडीचे नियोजन -- ६०,१००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com