Gharkul Scheme: वेळेत बांधकाम सुरू न करणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांवर कारवाई

पाचोरा तालुक्यात ज्या ग्रामपंचायती अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी परवानगी देण्यात येऊन पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे.
Gharkul Scheme
Gharkul SchemeAgrowon

Jalgaon Ghrakul Scheme News : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने (PM Awas Scheme) अंतर्गत सन २०१६ ते २०२२ या कालावधीत निवासी प्रयोजनासाठी घरकुल (Gharkul Contraction) बांधण्यास परवानगी देण्यात येऊन पहिला हप्ता वितरित करण्यात आला.

शंभर दिवसात बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित असताना गेल्या पाच ते सहा वर्षात घरकुलांचे बांधकाम सुरूच झालेले नसल्याचे समोर आले. अशा लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेतर्फे सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेने ही कारवाई सुरू केली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी याबाबत लक्ष घातले आहे. जिल्ह्यात पाचोरा सह चाळीसगाव तालुक्यात लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिस प्रशासनाला पत्र देखील देण्यात आले आहे.

Gharkul Scheme
Gharkul Yojana : नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार

यापुढे जिल्ह्यात पहिला किंवा दुसरा हप्ता वितरित करण्यात येऊनदेखील शंभर दिवसाच्या आत बांधकामे पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांच्या मालमत्तांवर बोझे चढविण्याची प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या आहेत.

नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यकारी संचालक स्नेहा कुडचे उपस्थित होत्या.

पाचोरा तालुक्यात ज्या ग्रामपंचायती अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी परवानगी देण्यात येऊन पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. अशा लाभार्थ्यांच्या समक्ष भेटी घेतल्या जातील.

Gharkul Scheme
घरकुल योजनांसाठी मिळणारा निधी कमी

पाहणी करून त्यात समर्पक उत्तर न देणाऱ्या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे.

पाचोरा तालुक्यात नगरदेवळा, लोहारा, पिंपळगाव, कळमसरा, वडगाव, लाजगाव ग्रामपंचायती अंतर्गत घरकुलाचे काम सुरु न करणाऱ्या ११६ लाभार्थ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी ग्रामसेवकांनी संबंधित पोलिस स्टेशनला पत्र दिले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com