Exam : परीक्षार्थींसह शिक्षकांवरही कारवाई

प्रश्‍नपत्रिका व्हायरल करणाऱ्यांवर तसेच अफवा पसरणाऱ्या समाजकंटकांवर प्रशासनाची करडी नजर आहे.
Exam
Exam Agrowon

Nagar Exam News : कॉपीमुक्त अभियानाचा (Copy Free Exam) नगर जिल्ह्यात सकारात्मक परिणाम झाला आहे. दहावी- बारावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू आहे. विद्यार्थी कॉपीपासून दूर राहावेत, यासाठी विद्यार्थ्यांचे मानसिकतेत बदल होत आहे.

दहावीच्या परीक्षेबाबतही (SSC Exam) खबरदारी घेतली जात आहे. बारावी परीक्षेत आतापर्यंत २४ परीक्षार्थी कॉपी करताना आढळले. त्यांच्यावर भरारी पथकाने कारवाई केली आहे.

कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत त्याला कारणीभूत धरून शिक्षकांवरही कारवाई केली जात आहे असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात कॉपीमुक्ती अभियान राबवले जात आहे. पाथर्डी, शेवगाव, पारनेर तालुक्यांतील ग्रामीण भागातील काही शाळांचे अपवाद वगळता जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान बऱ्यापैकी यशस्वी होत आहे.

Exam
Exam Center : संवेदनशील परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर आदींसह पथके तपासणी करत आहेत.

परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्ती आढळल्यास तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात उपद्रव करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत. सेंट झेविअर हायस्कूलमधून प्रश्‍नपत्रिका व्हायरल झाल्याची अफवा पसरली होती. मात्र असा प्रकार झाला नाही.

प्रश्‍नपत्रिका व्हायरल करणाऱ्यांवर तसेच अफवा पसरणाऱ्या समाजकंटकांवर प्रशासनाची करडी नजर आहे. तसा प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

सर्व संवेदनशील परीक्षा केंद्रावर काही विशिष्ट पेपरला व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे, असे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले.

दरम्यान, गुरुवारपासून (ता.२) दहावी परीक्षेला सुरुवात झाली. जिल्ह्यात १७९ परीक्षा केंद्र आहेत. ६९ हजार ५३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. २१ परीक्षक केंद्र आहेत.

नगर शहरात १७, नगर ग्रामीण १२, श्रीरामपूर १०, संगमनेर १७, कोपरगाव १०, राहाता ११, पाथर्डी १३, कर्जत १२, अकोले १५, शेवगाव ९, नेवासा १४, राहुरी ८, पारनेर १३, श्रीगोंदा १३, जामखेड ५ अशी १७९ परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.

Exam
MPSC Exam : जो सर्वोत्तम, तोच स्पर्धेत टिकेल

संवेदनशील परीक्षा केंद्रावर बैठे पथक नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्राबाहेरील झेरॉक्स दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. भरारी पथकांची संवेदनशील केंद्रावर नजर आहे.

परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्ती आढळल्यास तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात उपद्रव करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.

तसेच कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत त्याला कारणीभूत धरून शिक्षकांवरही कारवाई केली जात आहे असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com