देशात युरिया आणि डीएपी खतांचा पुरेसा साठा ः मनसुख मांडविया

देशात खतांचा, विशेषत: युरिया आणि डीएपीचा पुरेसा साठा असून, तो डिसेंबरपर्यंत पुरेल.
Fertilizer
Fertilizer Agrowon

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खतांचा, विशेषत: युरिया आणि डीएपीचा (Urea And DAP Fertilizer) पुरेसा साठा (Fertilizer Stock) असून, तो डिसेंबरपर्यंत पुरेल. केंद्र शेतकऱ्यांना सुमारे २.२५ लाख कोटी रुपये वार्षिक अनुदान (Fertilizer Subsidy) देत आहे, अशी माहिती केंद्रीय रसायन आणि खतेमंत्री मनसुख मडाविया (Mansukh Mandviya) यांनी सोमवारी (ता. ६) दिली. सरकार शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामासाठी खते सहज उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती सहा महिन्यांनंतर खाली येऊ शकतात या पार्श्‍वभूमीवर भारताने खरीप आणि रब्बी हंगामासाठी आधीच खतांचा साठा केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मांडविया म्हणाले, की देश युरिया उत्पादनात स्वावलंबी होण्याच्या मार्गावर आहे आणि बिहारमधील बरौनी युनिट आणि झारखंडमधील सिंद्री येथे ऑक्टोबरपासून उत्पादन सुरू करेल आणि यातून दरवर्षी २५ लाख टन युरियाचे उत्पादन होईल.

ते म्हणाले, की खत विभाग देशातील शेतकऱ्यांना अनुदानित खते उपलब्ध करून देतो आणि युरियाची ४५ किलोची पिशवी किरकोळ दुकानात बसवलेल्या पीओएस उपकरणांद्वारे शेतकऱ्यांना २६६ रुपयांना विकली जाते, तर सरकार बॅग सुमारे ३ हजार रुपयांना खरेदी करते.

कृषी व्यतिरिक्त, युरियाचा वापर इतर अनेक क्षेत्रांमध्ये जसे की राळ, गोंद, प्लायवुड, क्रॉकरी आणि औद्योगिक खाण स्फोटकांमध्ये केला जातो, असे सूत्रांनी सांगितले.

सूत्राच्या मते, शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनुदानित युरियाचा गैरवापर, काळाबाजार रोखण्यासाठी मंत्रालयाने भरारी पथकांची स्थापना केली आहे. समर्पित अधिकाऱ्यांचे हे पथक खत आणि संबंधित युनिट्सची अचानक तपासणी करते आणि कमी दर्जाच्या खतांच्या पुरवठ्यावरही लक्ष ठेवते.

खते विभागाच्या भरारी पथकाने अलीकडेच हरियाना, केरळ, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसह देशाच्या विविध भागांत युरियाची ३५ हजार पोती जप्त केली आहेत. आठ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत आणि युरिया उद्योगांकडे वळवल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या सूत्रांनी नमूद केले, की युरिया उद्योगांसाठी वळवण्यात गुंतलेल्यांवर कठोर कारवाई केली जाते. खते विभागाने आठ राज्यांमधील ३८ मिश्रण उत्पादन युनिट्सवर कारवाई केली, त्यापैकी बहुतांश महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि बिहारमध्ये आहेत. सर्व ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या निष्कर्षांच्या आधारे, राज्यांना उत्पादन रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com