
Snagli News : जिल्ह्यात पाणी टंचाई (Water Shortage) भासू शकते. जिल्ह्यातील १०२ गावात, ४१५ वाड्यवस्त्यांवरील विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. जिल्हा प्रशासन संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सज्ज झाले आहे. टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने ४ कोटी २१ लाखांचा आराखडा तयार केला आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह इतर तालुक्यांत गेल्या तीन वर्षांपासून अपेक्षित पाऊस झाला आहे. दुष्काळी पट्ट्यात परतीच्या पावसामुळे भूजल पातळीतही वाढ झाली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात पाणी टंचाई भासली नाही.
यामुळे जिल्हा प्रशासनाचा कोट्यवधींच्या होणाऱ्या खर्चात बचत झाली आहे. यंदाही सर्वदूर पावसाने चांगली हजेरी लावली आहे; मात्र, वाढत्या उन्हामुळे भूजल पातळी घटू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट येण्याची शक्यता आहे.
मार्च ते जून या कालावधीत दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठे महांकाळ, खानापूर, तासगाव आणि जत तालुक्यात पिण्यासह शेतकऱ्यांच्या पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजनांचे नियोजन सुरू केले आहे. गेल्या वर्षीचा टंचाई आराखडा विचारात घेऊन तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या मदतीने टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील तीन गावे आणि एका वाडीवरील आणि शिराळा तालुक्यातील सहा गावांत दोन वाड्यांत अशा ९ गावांत आणि तीन वाड्यावस्त्यांवरील विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. एप्रिल ते जूनसाछी ९० गावांत ४१२ वाड्यावस्तांवरील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
...असा आहे आराखडा
विंधन विहीर घेण्यासाठी - २५ लाख २० हजार
विहिरी अधिग्रहणासाठी - ६३ लाख ७८ हजार
टॅंकरने पाणी पुरवठ्यासाठी - ३ कोटी ३२ लाख ६८ हजार
एकूण - ४ कोटी २१ लाख
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.