सप्टेंबरमध्येच भातपिकाची खरेदी सुरु करा: स्टालिन यांचे मोदींना पत्र

केंद्र सरकारने २०२२ च्या खरीप विपणन हंगामासाठी जाहीर केलेला सुधारित हमीभाव हा १ ऑक्टोबर २०२२ नंतरच लागू होणार आहे. तर शेतकऱ्यांचे उत्पादन (भातपीक) ऑगस्टच्या अखेरपासूनच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
सप्टेंबरमध्येच भातपिकाची खरेदी सुरु करा: स्टालिन यांचे मोदींना पत्र
M.K.Stalin & Narendra ModiAgrowon

केंद्र सरकारने एक महिना आधीच तामिळनाडूमधील भातपिकाची (Paddy) हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी तामिळनाडू सरकारने केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून भातपिकाची खरेदी १ ऑक्टोबरऐवजी १ सप्टेंबरपासून करण्यात यावी, असा आग्रह तामिळनाडूच्या धरला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन (M.K. Stalin) यांनी मंगळवारी (२१ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली. सप्टेंबर अखेरीस अथवा ऑक्टोबरपूर्वी सुरु होणारा राज्यातील भातपिकाच्या काढणीचा हंगाम हा दक्षिण-पश्चिम मॉन्सून अथवा ईशान्य मॉन्सूनचा काळातच येतो. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते, असे स्टॅलिन यांनी मोदीना लिहिलेल्या नमूद केले.

शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी यंदा राज्य सरकारने तसे पूर्वनियोजन केले असून शेतकऱ्यांना त्यांच्या भातपिकाची काढणी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात करणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारने २०२२ च्या खरीप विपणन हंगामासाठी जाहीर केलेला सुधारित हमीभाव (MSP) हा १ ऑक्टोबर २०२२ नंतरच लागू होणार आहे. तर शेतकऱ्यांचे उत्पादन (भातपीक) ऑगस्टच्या अखेरपासूनच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ऑक्टोबरऐवजी सप्टेंबरपासूनच तामिळनाडूतील भातपिकाची (Paddy) हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी स्टॅलिन यांनी केली.

दरम्यान हे वर्ष तामिळनाडूतील शेतकऱ्यांसाठी अनुकूल ठरले. केंद्र सरकारने जर १ सप्टेंबरपासून हमीभावाने (MSP) भातपिकाची खरेदी केली तर केंद्राने जाहीर केलेल्या सुधारित हमीभावाचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास स्टॅलिन यांनी पत्रात व्यक्त केला. स्टॅलिन यांनी पत्रात खरीप हंगामापूर्वी सुधारित हमीभाव जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान भातपिकाच्या हमीभावाने खरेदीवरून गेल्या काही महिन्यांत तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष पहायला मिळाला. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आणि भाजपमध्ये (BJP)आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. आता तामिळनाडू सरकारने केंद्राकडे भातपिकाच्या आगाऊ खरेदीची विनंती केली असून मोदी या मागणीला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com