राज्यात माॅन्सूनची धीमी चाल

महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनने एक दिवस मुक्काम करत बुधवारी मराठवाड्याच्या काही भागांत प्रगती केली. माॅन्सूनची वाटचाल धीम्या गतीने सुरु आहे.
राज्यात माॅन्सूनची धीमी चाल
monsoonagrowon

पुणेः महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनने एक दिवस मुक्काम करत बुधवारी (ता.१५) मराठवाड्याच्या काही भागांत प्रगती केली. माॅन्सूनची वाटचाल धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे माॅन्सूनची सीमा नंदूरबार, जळगाव, परभणी , मेडगपर्यंत कायम आहे. तर पुढील दोन ते तीन दिवासांत मॉन्सून देशाच्या आणखी काही भागांत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तविला.

१० जून रोजी कोकणात प्रवेश करणाऱ्या मॉन्सूनने(monsoon) १२ जून रोजी संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंतचा टप्पा गाठला होता. तर सोमवारी (ता.१३) निम्म्या महाराष्ट्रासह, दक्षिण गुजरात, कर्नाटकचा बहुतांश भाग, तेलंगाणा, रायलसीमाचा काही भाग आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागांतही मॉन्सूनने चाल केली होती. राज्यात सोमवारी माॅन्सून नंदूरबार, जळगाव, परभणीपर्यंत पोचला होता. मात्र मंगळवारी माॅन्सूनने याच भागांत मुक्काम केला. त्यानंतर बुधवारी माॅन्सूनने मेडगपर्यंत प्रगती केली. राज्यात माॅन्सूनची प्रगती धीम्या गतीने सुरु आहे. तर बुधवारी माॅन्सूनने संपूर्ण कर्नाटक आणि तमिळनाडू राज्य व्यापले.

बुधवारी राज्यात माॅन्सूनने धीमी प्रगती केली. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत माॅन्सून विदर्भापर्यंत मजल मारेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. तसेच संपूर्ण तेलंगणा, आंध्र प्रदेश, बंगालच्या उपसागराचा काही भाग तर पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडच्या काही भागांत माॅन्सून पुढील दोन ते तीन दिवसांत प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने(IMD) व्यक्त केला.

दरम्यान, राज्यात माॅन्सूनची चाल धीमी झाल्याने जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. बहुतांशी भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. तर माॅन्सून दाखल झालेल्या भागांतही पावसाने जोर धरलेल्या नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com