Nashik Apmc Election : अर्ज छाननी प्रक्रियेनंतर आता माघारीकडे लक्ष

नाशिक जिल्ह्यात १४ बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून बुधवारी (ता. ५) अर्ज छाननीच्या दिवशी जिल्हाभरात अनेकांचे अर्ज बाद झाले.
Nashik APMC Election
Nashik APMC ElectionAgrowon

Nashik Election Update : नाशिक जिल्ह्यात १४ बाजार समित्यांच्या निवडणुकीची (Market Committee Election) रणधुमाळी जोरात सुरू झाली असून बुधवारी (ता. ५) अर्ज छाननीच्या दिवशी जिल्हाभरात अनेकांचे अर्ज बाद झाले. सर्वाधिक २८ अर्ज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बाद झाले आहेत. '

मालेगाव, घोटी येथेही ही संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेकांचे अर्ज वैध असल्याने माघारीकडे लक्ष लागले आहे.

आजी माजी लोकप्रतिनिधींनी बाजार समिती निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज छाननीवेळी माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्याविरोधात प्रतिस्पर्धी अनिल ढिकले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हरकत घेतली.

छाननीत पाच अर्ज बाद झाले. यातील पिंगळे यांच्या अर्जावर निर्णय बाकी होता. पिंगळे यांचा महाविकास आघाडी गट, तर चुंभळे व खासदार गोडसे यांचा शिंदे गट-भाजप अशी युती प्रणीत पॅनेलनिर्मितीची शक्यता आहे.

Nashik APMC Election
APMC Income : पाच बाजार समित्यांत उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

लासलगाव येथे छाननीत सहकारी संस्था मतदार संघाच्या सर्वसाधारण जागेसाठी नवनाथ वैराळ, विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातील गणेश डोमाडे, ग्रामपंचायत संघातील सर्वसाधारण मतदार जागेसाठी विजय सानप, आर्थिक दुर्बल घटकातील राजेंद्र बोरगुडे या चार प्रमुख उमेदवारांसह एकूण २८ जणांचे अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरविण्यात आले.

त्यामुळे आता १८३ उमेदवार रिंगणात आहेत. पिंपळगाव बसवंत येथे विविध कारणांवरून १३ उमेदवारांचे १५ अर्ज बाद झाले. तर २९४ अर्ज वैध ठरले.

जिल्ह्यातील गटनिहाय अर्जांची स्थिती

बाजार समिती- एकूण- वैध- बाद

नाशिक - १७५- १७० - ५

पिंपळगाव- ३०९ - २९४- १५

लासलगाव- २११ - १८३- २८

दिंडोरी - १७२ - १५६ - १६

कळवण - १३२- १३०- २

देवळा - १४७- १३९- ८

चांदवड - १७२- १६१- ११

मालेगाव - २०२ - १७६- २६

नांदगाव- १४८- १३१ - १७

मनमाड- १५०- १४९- १

येवला - २१७ - २०३ - १४

सिन्नर - १८०- १६९- ११

सुरगाणा- २५- २३ - २

घोटी- १६०- १३९- २१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com