Umred Market Committee Election : उमरेडलला तीन वर्षांनंतर निवडणुकीची लगबग

सुरुवातीची दोन वर्षे कोरोना आणि त्यानंतर परत एक वर्ष याप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून उमरेड बाजार समितीचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे.
APMC Election
APMC ElectionAgrowon

Nagpur Election Update : सुरुवातीची दोन वर्षे कोरोना आणि त्यानंतर परत एक वर्ष याप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून उमरेड बाजार समितीचा (Umred Bazar Committee) कारभार प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आघाड्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

बाजार समितीवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकराज आहे. हा कार्यकाळ संपुष्टात यावा, यासाठी सहकार क्षेत्रातील इच्छुकांकडून चातकासारखी वाट बघितली जात होती. आता न्यायालयाच्या निर्देशानुसार बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

त्यामुळे इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. उमरेड बाजार समितीमध्ये १८ संचालकांसाठी सामना रंगणार आहे. यामध्ये सेवा सहकारी मतदार संघातून ११, महिला संघातून दोन, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांच्यासाठी प्रत्येकी एक आणि सर्वसाधारण गटातून सात याप्रमाणे जागा राखीव असणार आहेत.

APMC Election
Jalgaon Market Committee Election Update : जळगाव बाजार समिती निवडणुकीत शिंदे गट, भाजपचा फॉर्म्यूला

उमरेड तालुक्‍यात एकूण ३६ सेवा सहकारी संस्थांचे जाळे असून, एकूण मतदारांची संख्या ४६७ आहे. तालुक्‍यातील ग्रामपंचायतींची संख्या ४८ आहे. मतदार सदस्य ४,४४ आहेत. या गटात एकूण चार जागांसाठी निवडणूक होईल.

यामध्ये दोन जागा सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी प्रत्येकी एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

अडते, व्यापारी गटातील दोन जागांवर लढत होईल. या गटात एकूण १२७ मतदार आहेत. यापैकी ७८ अडते आणि ४९ व्यापाऱ्यांचा समवेश आहे. हमाल मापाडी गटातून एकमेव उमेदवार निवडून द्यायचा आहे. या गटात १८९ मतदार आहेत.

सहाय्यक निबंधक कार्यालयात बुधवार (ता.१२) पर्यंत अर्ज सादर करता येतील. गुरुवारी (ता.१३) छाननी असून सोमवारी (ता.१७) उमेदवारांची अंतिम यादी लागेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com