पाच पर्यटनस्थळांसाठी खासगी विकसकांसोबत करार

कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सेवा आणि आदरातिथ्य क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वाव आहे.
Mahabaleshwar
MahabaleshwarAgrowon

मुंबई : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव संपल्यानंतर सेवा आणि आदरातिथ्य क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील पाच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना (Tourist) दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी उद्योजकांबरोबर करार करण्यात आला असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनीचा खासगीकरणाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाबळेश्वर, माथेरान, मिठबाव, हरिहरेश्‍वर आणि ताडोबा येथे निवास सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खासगी विकासकांना सवलतीचे करारपत्र देण्यात आले. या वेळी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय ढेकणे आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘राज्यात सर्व प्रकारची पर्यटनस्थळे आहेत. येथे पर्यटकांना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात पाच पर्यटनस्थळांची निवड करण्यात आली आहे. महाबळेश्‍वर, माथेरान, मीठबाव व हरिहरेश्‍वर येथील पर्यटन निवांसाकरिता व ताडोबा येथील मोकळ्या जागेकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून, पात्र विकासकांची नियुक्ती पूर्ण झालेली आहे. शासन आणि विकासकांचा हा संयुक्त उपक्रम असेल. आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आला असून विविध परवान्यांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com