Agricultural Department : मानधन वाढीची कृषिसेवकांना प्रतीक्षाच

प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना अनुक्रमे १६, १८ व २० हजार रुपयांची मानधन वाढ दिली आहे.
Agricultural Department : मानधन वाढीची कृषिसेवकांना प्रतीक्षाच

Agriculture Department News : कृषिसेवकांचे मानधन (Agriculture Assistant) ६ हजार रुपयांवरून १६ हजार रुपये करून त्यात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने मागणी केली होती. ही मागणी मुख्य सचिवांच्या बैठकीत मान्य झाली होती.

मात्र मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळावी, अशी संघटनेची मागणी होती. असे असताना राज्य शासनाच्या वतीने मंगळवारी (ता. ७) शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासननिर्णय झाला.

मात्र कृषिसेवकांची मागणी प्रलंबितच राहिली. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Agricultural Department : मानधन वाढीची कृषिसेवकांना प्रतीक्षाच
Agriculture Department : राज्यातील कृषिसेवक मानधन वाढीच्या प्रतीक्षेत

प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना अनुक्रमे १६, १८ व २० हजार रुपयांची मानधन वाढ दिली आहे.

ती १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. मात्र कृषी सेवकांना आश्वासन देऊन अद्याप वंचित ठेवले असल्याची चर्चा आहे.

शासन मंत्री यांनी तत्काळ मागणी मान्य करावी. शिक्षण सेवकांप्रमाणे कृषिसेवकांच्या मानधनात १६ हजार रुपयांपर्यंत वाढ करावी. कृषी सेवक सध्या अवघ्या ६ हजारांत घर चालवीत आहेत. त्यामुळे मानधनात वाढ होण्यासाठी सकारात्मक शासन निर्णय होण्याची गरज आहे.
जयकीर्तीमान पाटील, राज्य प्रतिनिधी (नाशिक)-महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना
निर्णय तातडीने होण्याची गरज आहे. मागण्या विचारात घेऊन उपसचिवांनी संघटनेला ते आश्वासन दिलेले आहे. त्यानुसार आमचा पाठपुरावा सुरू आहे.
संदीप केवटे, अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com