Farmer Income : शहरी युवकांसाठी शेतीचा व्यावसायिक सातबारा

शेती विषयाकडे पाहताना शहरी भागातील लोकांच्या भावना या शेती म्हणजे सहज श्रीमंत होण्याची विद्या या दृष्टिकोनातून असल्याचे दिसून येते.
Farmer Income
Farmer IncomeAgrowon

- गणेश आबासाहेब शिंदे

शेती विषयाकडे पाहताना शहरी भागातील लोकांच्या भावना या शेती (Agriculture) म्हणजे सहज श्रीमंत होण्याची विद्या या दृष्टिकोनातून असल्याचे दिसून येते. बहुतांश शहरात राहणारे कामगार, नोकरदार, उच्चपदस्थ अधिकारी, व शहरी जीवन आत्मसात केलेल्या युवकांच्या मध्ये शेती बद्दल चर्चा होताना दिसून येतात.

या चर्चा शेती व्यवस्थित केली तर कसा लाभ होतो, नेमकं अर्थकारण कसे आहे, शेळी पालनातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल कशी होते, जिरेनियम मधून किती पैसे मिळतात, कांद्याचा होणारा पैसा, कुक्कुटपालन या बद्दल सकारात्मक दृष्टिकोन उहापोह सुरू असताना दिसून येते.

कोणत्याही गोष्टीकडे सर्वांगाने पाहणे ही नवीन निर्मितीसाठी आवश्यक गोष्ट असते. मात्र बहुतांश वेळा जितके शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न आहेत, शेतीच्या समस्या आहेत यावर तितक्याच तन्मयतेने विचार व विनिमय होत नाही. त्यामुळे या चर्चा, पाहण्याचा दृष्टिकोन हा एकांगी वाटतो. 

शेतीकडे निव्वळ फायदा म्हणून पाहणाऱ्या लोकांच्या लक्षात येत नाही की दिसणारा हे उजेडाचा कवडसा आहे, मागील अंधकार हा प्रचंड मोठा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे व युवकांचे लोंढे सातत्याने येताना आपल्याला आढळून येतात. 

Farmer Income
Soybean Rate : सोयाबीन, कापूस, मक्याच्या आवकेत वाढ

शेतीच्या प्रश्नांची दुसरी बाजू अशी की बियाण्यांचा काळाबाजार, खतांची महागाई व साठवणूक करून हंगामात केला जाणारा कृत्रिम तुटवडा, दुबार पेरणी, रोगराई, वादळ, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी अशा येणाऱ्या संकटांची यादी ही न संपणारी आहे. याकडे दुर्लक्ष करून नवीन शेतीकडे वळणारा युवक जाऊ शकत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे; व व्यवसाय, पिकपद्धती, जोडधंदा हे करताना सर्वांगीण अभ्यास. शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधून सर्वांगीण गोष्टींचा उहापोह केला पाहिजे. तरच काहीतरी सकारात्मक घडू शकते. 

बहुतांश वेळा आपण यशाच्या कथा, व्हिडीओ, मुलाखती यांना ऐकून निर्णय घेण्याकडे वाटचाल करतो. त्यात बहुतांश वेळा कांद्याची लॉटरी लागली, चंद्राच्या कोरीवाले बोकड दीड लाखला गेले, कुक्कुटपालन मधून इतका फायदा, दुधातून आलेली समृद्धी, शेळीपालन व त्या मागील अर्थकारण हे त्याच कथा व मुलाखतीच्या दृष्टिकोनातून पाहतो. मात्र वस्तुस्थिती वेगळी असते. जसे की जमिनीचा पोत, उपलब्ध असलेले मार्केट, वाहतूक व्यवस्था, पैश्यांचे नियोजन, पाण्याची उपलब्धता, कामगार आणि या साठी लागणारी जमीन आशा सर्वच गोष्टी यामागे असतात. या कडे सर्वांगीण दृष्टीने पाहून आपण निर्णय घेणे अवश्य असते. 

राज्यात शेतकऱ्यांचे बहुतांश फार्म फेमस आहेत. कित्येक वेळा त्या मागील असणारे अर्थकारण हे वेगळ्या पद्धतीचे असावं असे अभ्यास केल्यावर लक्ष्यात येते. त्यामुळे कागदी नफ्याच्या आकड्यांना न भुलता स्वतः पद्धतीने कल्पकतेने व अतिशय लहान असा रिसर्च करून मगच शेतीकडे व शेती व्यवसायाकडे वळले पाहिजे. नाहीतर तुमच्या सर्व स्वप्नांना मूठ माती देऊन पारंपरिक पद्धतीने शेती करावी लागते, नाहीतर शेती व शेती व्यवसायातून पुन्हा शहराकडे वळावे लागते. 

शेती क्षेत्रात काम करणारे बहुतांश शेतकरी ही हुशार आहेत, नव्याने सुशिक्षित मुलं सुद्धा शेती चांगल्या प्रकारे करत आहेत. मात्र त्यांना आव्हानांची, त्या मागील अर्थकारणाची नेमकी व अचुक माहिती आहे. त्यामुळे आपण तो सर्वज्ञानी म्हणून शेतीकडे वळण्यापेक्षा मला सगळं समजून घेऊन मग शेतीकडे वळायचे आहे ही भूमिका शेती कडे वळणाऱ्या युवकांची व शहरी भागातील लोकांची असली पाहिजे. नाहीतर यश कथा पब्लिश होतात; अपयश कथा या अंधारात गुडूप झालेल्या पाहायला मिळतात.

Farmer Income
Wheat Sowing : गहू पेरणी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com