Kharif Season : कृषी विभागाने सुरू केली खरीप हंगामाची तयारी

Kharif Season Update : खरीप हंगामाची पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयारी सुरू केली असून, पुणे विभागामार्फत कृषी आयुक्तालयाकडे सुमारे ३३ हजार ३६५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Kharif Season Pune News : खरीप हंगामाची पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयारी सुरू केली असून, पुणे विभागामार्फत कृषी आयुक्तालयाकडे सुमारे ३३ हजार ३६५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.

कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी दिल्यानंतर बियाण्यांचा पुरवठा केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी दोन लाख ७ हजार २५० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने केला आहे.

मागील तीन ते चार वर्षांमध्ये खरीप हंगामात बियाण्यांची कमी-अधिक विक्री झाली आहे. सरासरी २८ हजार ५१५ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. गेल्या वर्षीही खरिपासाठी २९ हजार ५३० क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती.

कृषी विभागाने मागणीमध्ये ३,८३५ क्विंटलने वाढ केली असून, जवळपास ३३ हजार ३६५ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आले आहे.

Kharif Season
Crop Loan : जून- 2023 अखेर खरीप पिक कर्ज वाटपाचे करा ; जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बॅंकांना आदेश

पीकनिहाय बियाण्यांची मागणी : (क्विंटलमध्ये)

वाण बियाणे

भात - १४,५००

संकरित बाजरी- २३३७

मका - २७३०

तूर - १७८

मूग - ३२६

उडीद - ११३

सोयाबीन - ९५८१

इतर पिके - ३६००

जून महिना जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. खरिपात बियाणांच्या अडचणी येऊ नये म्हणून आताच मोठ्या प्रमाणात बियाण्यांची मागणी केली आहे. लवकरच या खताला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत.
संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com