
Soalapur Kharif Season Update : खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, बीबियाणे व पीक संरक्षक औषधे योग्य दरात व मुबलक प्रमाणात कृषी विभागाने उपलब्ध करून द्यावीत, शेतकऱ्यांच्या तक्रारी येता कामा नये, तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारी खते व औषधे बनावट नसावीत, याकडे ही कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे, अशी सूचना आमदार यशवंत माने (MLA Yashwant Mane) यांनी केली.
मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रात मोहोळ तालुक्याची खरीप हंगाम नियोजन बैठक पार पडली. त्यावेळी आमदार माने मार्गदर्शन करीत होते. यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बळीराम साठे, तहसीलदार प्रशांत बेडसे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीनिवास पदमावार, कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांनी खरीप नियोजनाचे सादरीकरण केले. याप्रसंगी तालुक्यातील पीक स्पर्धा विजेते, प्रयोगशील शेतकरी, अधिकारी/कर्मचारी यांच गौरव करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ट्रॅक्टर तसेच इतर अवजारे वाटप कार्यक्रम व कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. शरद जाधव यांनी खरीप पिकांचे लागवड तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ललिता वाघमोडे यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.