Agriculture Economy : आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यात परंपरेची आडकाठी ?

बहुतेक भारतीय शहरे बहुसांस्कृतिक होती. एकट्या नगर मध्ये फ्रेंच, रशियन, आणि इतर देशातील लोकांच्या वसाहती होत्या.
National Council of Agricultural Research
National Council of Agricultural Research Agrowon

लेखक- नीरज हातेकर

अठराव्या शतकात भारताचा (India) जगाच्या औद्योगिक (Industrialization) उत्पंनातील वाटा २५ टक्के होता. ह्यातील बहुतेक हिस्सा हा वस्त्रोद्योगाचा (Textile Industry) होता. भारतात उंची वस्त्र विणली जात होती कारण त्यांना जागतिक बाजारपेठ (Market) होती. कोणत्याही उत्पादनात नविन शोध  लागायचे असतील तर त्याला एक किमान स्केल लागते. आतंरराष्ट्रीय बाजारपेठांत ती स्केल आपल्या विणकरांना मिळाली. शिवाय बहुतेक सगळे विणकर शहरी भागातून रहात असत.

बहुतेक भारतीय शहरे बहुसांस्कृतिक होती. एकट्या नगर मध्ये फ्रेंच, रशियन, आणि इतर देशातील लोकांच्या वसाहती होत्या. नवीन कल्पना  सुचण्या साठी जे निरनिराळे विचार प्रवाह समोर यायला लागतात त्यासाठी हे आवश्यक होते . 

ह्या उलटं खेड्यातून असलेली बलुतेदारी ही मुळात उत्पादन व्यवस्था नव्हती तर जाती व्यवस्था होती.. तिथे स्केल सुद्धा नव्हती आणि नविन कल्पना सुद्धा नव्हत्या. म्हणून इथे नवीन शोध लागले नाहीत. भारतात शेकडो वर्षे  खेड्यात बैल गाडीचे चाक दगडी आणि आरे नसलेले सॉलिड होते. ते खुप जड तर होते, आणि त्रासदायक सुद्धा होते. पण ते बदलावे आशी कोणतीच प्रेरणा नव्हती.

National Council of Agricultural Research
Indian Economy : कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला तारले

जाती व्यवस्थेमुळे बदल करणेही अवघड होते. ह्या उलट वस्त्रोद्योगात बरेच बदल होऊ शकले. जेंव्हा जातीव्यवस्था बदलाच्या आड आली तेंव्हा काही ठिकाणी विणकरांनी इस्लाम स्वीकारून ह्यातून मार्ग काढला.. 

उच्च जातींना समुद्री व्यापार करायला जातीय बंधने आड आली. तेव्हासुद्धा त्यांनी इस्लाम स्वीकारून समुद्री व्यापारातील मुस्लिम व्यापाऱ्यांच्या व्यापारी जाळ्याचा फायदा घेतला. ते व्यापारात सक्षम झाले आणि समुह म्हणून संपन्न झाले. ह्या काळात भारतीय शेतीत झालेला एकमेव बदल म्हणजे मिरची सारखी नविन पिके. त्याला मागणी आणि बाजारपेठा असल्यामुळे शेतकऱ्यांनी लावली. आतंरराष्ट्रीय प्रवाहांतून झालेला हा बदल.

थोडक्यात, जागतिक प्रवाहांशी जोडून घेणे गरजेचे. त्यातुन समाज पुढे जातो. जगाशी जोडून घेणे, मिळाल्या संधींचा फायदा घेणे, गरज भासली तर परंपरा टाकून देणे, नविन गोष्टी स्वीकारणे, आर्थिकदृष्टया संपन्न होणे, हा राष्ट्र निर्मितीचा मार्ग आहे. 

ह्याउलट जगात काय चाललंय ह्याच्याशी घेणे देणे नसलेले, स्वतःच्या परंपरेच्या जुनाट कल्पंना उराशी कवटाळून , आम्हीच काय ते थोर मानणारा समाज पुढे जात नाही. तो मागेच जातो. हे राष्ट्र निर्मितीचे वगेरे कार्य नाहीये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com