Caste For Fertilizer : शेती हा आमचा धर्म...शेतकरी हीच आमची जात : रविकांत तुपकर

शेती हा आमचा धर्म आणि शेतकरी हीच आमची जात म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारच्या हेतुवर टीका केली आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

Ravikant Tupkar : रासायनिक खत (Chemical Fertilizer) खरेदीसाठी ई पॉस मशीनवर (e pos machine) शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. 

शेती हा आमचा धर्म आणि शेतकरी हीच आमची जात म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सरकारच्या हेतुवर टीका केली आहे.

Fertilizer
Fertilizer : खते खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना सांगावी लागणार जात

सरकारला शेतकऱ्यांची जात विचारावी लागते ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असल्याने त्याचा तीव्र निषेध यांनी व्यक्त केला.

"रासायनिक खतांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने आनलेल्या ई-पॉस मशीन मध्ये शेतकऱ्यांना आता जातीचा उल्लेख करावा लागणार आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

हे महाराष्ट्राच्या आधुनिक भूमिकेला साजेसे नाही, अशी भूमिकाही तुपकरांनी घेतली आहे." 

पुढे ते म्हणाले की, "छत्रपती शिवरायांनी जातीपातीच्या पलिकडे जाऊन स्वराज्यात सोन्याचं शिवार पिकवलं. हे सरकार त्यांचा एकही गुण न घेता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करत आहे. 

Fertilizer
Bio Fertilizers : सरकार युरियासोबत जैविक खते वापरण्याची सक्ती करणार का? केंद्रीय कृषिमंत्र्यांचा लोकसभेत मोठा खुलासा

केंद्र सरकारला धर्म आणि जातीवर शेतकऱ्यांमध्ये फुट पाडायची आहे," अशी संतप्त टीकाही तुपकरांनी केंद्र सरकारवर केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com