शेतीकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करा; कृषी मंत्री तोमर यांचे आवाहन

कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाच्या या कार्यक्रमात पाचशे नारळ उत्पादक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (Farmer Producer Organisation) सदस्यांनी सहभाग घेतला. बोर्डाच्या त्रिपुरा येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही यावेळी नरेंद्र सिंह तोमर यांच्याहस्ते करण्यात आले.
Coconut Farming
Coconut FarmingAgrowon

शेतकऱ्यांनी दैनंदिन शेतीकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा, असे आवाहन केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले आहे. याखेरीज देशभरात अधिक मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer Producer Organisations)सुरु होण्याची गरज असल्याचेही तोमर म्हणाले आहेत.

अन्नदाता देवो भवः (Annadata Devo Bhava) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या 'किसान भागीदारी प्राथमिकता हमारी' अभियानाचा भाग म्हणून कोकोनट डेव्हलपमेन्ट बोर्ड (Coconut Development Board) आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित जनजागृती कार्यक्रमात तोमर बोलत होते. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरीही यावेळी उपस्थित होते.

अगदी गावपातळीवरील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या कृषी क्षेत्रातील योजनांची माहिती देण्यात येत आहे. शेतीकामातील यांत्रिकीकरण , शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer Producer Organisation) , पीकविमा योजना इत्यादी सर्व गोष्टींची माहिती गाव पातळीवरच्या शेतकऱ्यांना देण्यासाठीच अन्नदाता देवो भवः अंतर्गत 'किसान भागीदारी प्राथमिकता हमारी' अभियान राबवण्यात येत असल्याचे तोमर म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांच्या सहभागावरच या अभियानाचे यश अवलंबून आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी विशेषतः अल्पभूधारकांसाठी केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची इत्थंभूत माहिती या अभियानाच्या माध्यमातून दिली जात आहे.

कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, साठवणुकीच्या आधुनिक सुविधा, कृषी वाहतुकीला देण्यात आलेले प्राधान्य, विविध पिकांचे अधिक उत्पादन देणारे बी-बियाणे, बँकाकडून करण्यात येणारा कर्जपुरवठा अशा अनेक गोष्टींची सविस्तर माहिती अभियानाच्या माध्यमातून पोहचवली जात असल्याचे तोमर यांनी सांगितले आहे.

यासाठी देशभरातील सर्व कृषी विज्ञान केंद्राच्या (Krishi Vigyan Kendras) माध्यमातून शेतकऱ्यांशी संपर्क साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाच्या या कार्यक्रमात पाचशे नारळ उत्पादक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (Farmer Producer Organisation) सदस्यांनी सहभाग घेतला. बोर्डाच्या त्रिपुरा येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही यावेळी नरेंद्र सिंह तोमर यांच्याहस्ते करण्यात आले.

कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाने (Coconut Development Board) केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, लक्षद्वीप आदी ठिकाणी अशी १४ संपर्क कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com