मेळघाटातून रुजणार ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ अभियान

कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली होती. या उपक्रमाची सुरुवात एक सप्टेंबरपासून होणार आहे. त्याकरिता अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या धारणी तालुक्यात अंतर्गत आदिवासी बहुल साद्रावाडी या गावाची निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Farmers
Maharashtra FarmersAgrowon

अमरावती : शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यातून निर्माण होणारे नैराश्य व आत्महत्या यांची कारणमीमांसा शोधून प्रभावी कृषीविषयक धोरण (Agriculture Policy) तयार करण्यात येणार आहे. यासाठी ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ हे अभियान राबविण्यात येणार असून त्याची मुहूर्तमेढ एक सप्टेंबर रोजी मेळघाटातून रोवली जाणार आहे.

राज्यातील शेतकरी आत्महत्या (Farmers Suicides) चिंतेचा विषय झाला आहे. यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या कार्यकाळात आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी पंतप्रधान पॅकेज घोषित करण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील मुख्यमंत्री पॅकेजची घोषणा केली होती.

कोट्यवधी रुपयांचा निधी यावर खर्च करण्यात आला. मात्र त्यानंतर आजवर आत्महत्या नियंत्रणात आल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे गट व भाजपने हा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेतला आहे. त्या अंतर्गत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत एक दिवस घालवावा लागणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न जाणता येतील अशी भावना आहे. शेतकऱ्यांना दैनंदिन काम करताना नेमक्या कोणत्या अडचणी भेडसावतात याचा प्रत्यक्ष मागोवा याद्वारे घेतला जाणार आहे.

शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत व त्याच्यासोबत दिवसभर घालवल्यानंतर आलेल्या अनुभवाचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. या दस्तऐवजाचा आधार घेत शेतकरी आत्महत्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा समग्र अहवाल तयार करून त्याआधारे धोरण ठरविण्याचे या उपक्रमातून प्रस्तावित आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली होती. या उपक्रमाची सुरुवात एक सप्टेंबरपासून होणार आहे. त्याकरिता अमरावती जिल्ह्याच्या धारणी तालुक्यात अंतर्गत आदिवासी बहुल साद्रावाडी या गावाची निवड करण्यात आली आहे. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कृषी विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विद्यापीठस्तरावर शास्त्रज्ञ अधिकारी, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, विभाग प्रमुख, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागस्तरावर विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक व इतर जिल्हास्तरीय अधिकारी, उपविभागीयस्तरावर उपविभागीय अधिकारी, महसूल, कृषी व इतर उपविभागीयस्तर अधिकारी. तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर तालुकास्तरीय अधिकारी अशा सर्वांना या उपक्रमात समावेशित करण्यात आले आहे.

कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तर महसूल, ग्रामविकास व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस शेतकऱ्याला भेट देण्याबाबत सूचना आहेत.

माझा एक दिवस बळीराजासाठी या अभियानाची सुरुवात कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळघाटातून होणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांना दैनंदिन शेती व्यवस्थापनात भेडसावणारे नेमके प्रश्न या माध्यमातून जाणता येतील.

किसन मुळे,विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com