Agriculture News : पंजाब सरकारच्या 'प्रोत्साहन' योजनेचा किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ?

'प्रोत्साहन' योजनेंतर्गत २३ हजार २०० पेक्षा अधिक यंत्राचे वाटप केले आहे. राज्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि स्थानिक कृषी सोसायट्यांचा यामध्ये समावेश आहे.
Crop Residue Management
Crop Residue ManagementAgrowon

पंजाब राज्य सरकारने (Punjab Government) भात पिकाच्या खुंट व्यवस्थापनसाठी (Crop Residue Management) 'प्रोत्साहन' योजनेंतर्गत २३ हजार २०० पेक्षा अधिक यंत्राचे वाटप केले आहे. राज्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि स्थानिक कृषी सोसायट्यांचा यामध्ये समावेश आहे.

२०२२ च्या खरीप हंगामापासून खुंट व्यवस्थापनासाठी कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहित देण्यासाठी 'प्रोत्साहन' ही योजना राबवली जात आहे, अशी माहिती पंजाबचे कृषिमंत्री कुलदीपसिंग धालीवाल (Kuldipsingh Dhaliwala) यांनी दिली. ते रविवारी (ता. १५) बोलत होते.

पंजाबमध्ये गहू प्रमुख पीक आहे. मात्र त्याबरोबरच भाताची लागवडही पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. भाताची काढणी केल्यानंतर उरलेली खुंट शेतकरी जाळतात.

त्यातून उडणाऱ्या धुरामुळे राज्यातील हवेचा दूषित होते. त्यामुळे यंत्राद्वारे खुंटाचे व्यवस्थापन करण्यासाठी पंजाब सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. तसेच राज्य सरकार खुंटाचे व्यवस्थापन करणाऱ्या ट्रॅक्टरचलित यंत्रावर अनुदान देत आहेत.

Crop Residue Management
Wheat Sowing : परभणी, हिंगोलीत गव्हाची ७३ हजार हेक्टरवर पेरणी

"ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये खुंट जाळण्याच्या घटनांमध्ये ३० टक्के घट झाली आहे. २०२१ मध्ये ७१ हजार १५९ शेतकऱ्यांनी भात शेतीतले खुंट जाळले होते. मात्र २०२२ मध्ये खुंट जाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४९ हजार ९२२ वर आली आहे." असा दावाही धालीवाल यांनी केला.

'प्रोत्साहन' योजनेंतर्गत शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी ५० ते ८० टक्के अनुदान दिले जाते. तसेच या अनुदानाचा फायदा शेतकऱ्याना व्हावा, यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज मागविण्यात आले होते, अशीही माहिती धालवाल यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, "कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यामध्ये केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जेणेकरून प्रामुख्याने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना यंत्र उपलब्ध होतील. त्यासाठी राज्य सरकारने ७.४ कोटी निधी मंजूर केला आहे."

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com