
G-20 Council : जी-२० देशांच्या कृषी प्रतिनिधींची पहिले चर्चासत्र सोमवारपासून (ता.१३) इंदूरमध्ये (Indore) आयोजित करण्यात आला.
कृषी क्षेत्रातील हवामान आधारित उपक्रमांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या तीन दिवस चर्चासत्राची सांगता १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलाचा (Change Weather) दुष्परिणाम भोगावा लागत आहे. यावर उपयोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते.
तसेच शेतकऱ्यांना शेतमाल बाजाराची माहिती मिळावी, यासाठी पुढाकार घेण्याच्या दृष्टीने जी-२० देशांच्या प्रतिनिधींचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
तसेच कृषी क्षेत्रातील जोखीम व्यवस्थापन आणि अन्न नासाडी कमी करण्याच्या मुद्यावर या चर्चासत्रात विचारमंथन करण्यात येणार आहे.
जगभरात २०२२ वर्ष शेतीक्षेत्राला कठीण राहिले. हवामान बदलामुळे जगभरात अन्नसुरक्षेचा प्रश्न उभा झालेला आहे. या पार्श्वभूमीवर चर्चासत्र महत्वाचे मानले जात आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दुपारी १ वाजता बैठकीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जागतिक भरडधान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर भरडधान्याच्या स्टॉलचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पशुसंवर्धन आणि मत्स्य खात्याच्या वतीने विविध स्टॉलही ठेवण्यात आले आहेत.
या चर्चासत्रासाठी मंगळवारी (ता.१४) केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंदीया उपस्थित राहणार आहेत. तसेच जी-२० देशातील उपस्थित प्रतिनिधींना मध्यप्रदेशातील ऐतिहासिक राजवाड्यांचे सहल घडवण्यात येणार आहे. त्यासाठी मध्यप्रदेश सरकारकडून जय्यत तयारी केली गेली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.