
Agriculture Supervisor Akola News : कृषी पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कृषिसेवा गट-ब (क) कृषी अधिकारी पदावर पदोन्नती देण्यासाठी माहिती मागविण्यात आली आहे. अनेकवेळेस पत्रव्यवहार करीत संघटनेने कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती देण्याबाबत विनंती केली होती.
परंतु याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने कृषी पर्यवेक्षक संघटनेने कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत संघटनेने सोमवारी (ता.२२) राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना तातडीचे निवेदन पाठवले आहे.
याबाबत कृषी पर्यवेक्षक संघटनेने म्हटले आहे, की अद्यापही पदोन्नतीची प्रक्रिया आयुक्तालय स्तरावर पूर्ण झालेली नाही. जानेवारीमध्ये पदोन्नती सभा घेण्याबाबत प्रक्रिया झाली होती. परंतु सध्या मे महिना संपण्यास येऊनही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अद्यापही विविध त्रुटी असलेली माहिती मागविण्यात येत आहे व यामुळेच सदर प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.
विभागामध्ये कृषी पर्यवेक्षकांना तदर्थ पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यापैकी बरेच लोक अद्याप नियमित व्हायचे आहेत. परीक्षेमुळे तदर्थ कृषी पर्यवेक्षकांना पदानवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कृषी पर्यवेक्षक ते कृषी अधिकारी पदोन्नती तत्कार करण्यात यावी. म्हणजे कृषी पर्यवेक्षकांवर पदानवत होण्याची वेळ येणार नाही.
पदोन्नती सभा घेण्याबाबत संबंधितांना तत्काळ आदेश देण्यात यावे व पात्र कृषी पर्यवेक्षकांना तत्काळ पदोन्नती देण्यात यावी. राज्य कार्यकारणीने घेतलेल्या निर्णयानुसार १० जूनपर्यंत आयुक्त कार्यालयाने पदोन्नती सभा न घेतल्यास संघटनेचे राज्यभरातील सर्व कृषी पर्यवेक्षक त्यांच्याकडे असलेला अतिरिक्त पदभार सोडतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.