या चिमण्यांनो परत फिरा रे...

निरोप हा तीन अक्षरी शब्द] पण निरोपामागे प्रत्येकाच्या आयुष्यभराची एक वेगळी कहाणी असते. ज्या सेवेत, ज्या नोकरीत आयुष्य रापून निघतं. तिथून निरोप घेताना अंतःकरण जड झालेलं असतं.
या चिमण्यांनो परत फिरा रे...

ज्योती आधाट/तुपे

या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या

जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या...

ग. दि. माडगूळकराचं हे गाणं आणि या ओळींतील भाव खूप संवेदनशील आहेत. निरोपाच्या कार्यक्रमात या ओळी जरूर आठवतात. आणि आवर्जून गायल्याही जातात. निरोप हा तीन अक्षरी शब्द] पण निरोपामागे प्रत्येकाच्या आयुष्यभराची एक वेगळी कहाणी असते. ज्या सेवेत, ज्या नोकरीत आयुष्य रापून निघतं. तिथून निरोप घेताना अंतःकरण जड झालेलं असतं.

या चिमण्यांनो परत फिरा रे...
Soybean Oil Import : सोयाबीन तेल आयात आठ टक्क्यांनी वाढली

मन भरून आलेली असतं. पण एकीकडे त्याच मनाला आता निवांतपणाही गरजेचा असतो. आणि आता वेळच वेळ आपल्याकडे असतो. पण त्या धावपळीचीही मनाला, शरीराला इतकी सवय झालेली असते, की कधी कधी धावपळही मनात इतर कोणतेही विचार येऊ देत नाही. मन एका लयीत धावत असतं. प्रत्येकजण निवृत्तीनंतर आपापल्या पद्धतीने आयुष्य जगतात. या काळात आयुष्यही कुठंतरी स्थिरावल्यासारखं असतं. जबाबदारी बऱ्या‍पैकी कमी झालेली असते. बरेच जण या काळात आध्यात्मिक मार्गाकडे ओढले जातात.

या चिमण्यांनो परत फिरा रे...
Cotton Rate : पावसामुळं कापूस उशीरा येणार?

निरोपाची सुरुवात होते ती चौथीत. या बालकांची अवस्था दोलायमान असते. पालकवर्ग या बालकांचा हायस्कुलमध्ये प्रवेश घेणार असतात पण त्यांचे मन आपल्या जुन्याच शाळेत घुटमळत असतं. चौथीतून पाचवीला जाणाऱ्‍या बालकांचे नेहमी एकच मागणं असतं, की मॅडम आम्हाला याच शाळेत शिकायचंय. इथे बारावीपर्यंतचे वर्ग काढा. त्यांचे हे शब्द ऐकून मन खूप भावनिक होतं. अक्षरशः चौथीची बालके पाचवीत गेल्यावर वर्गात खूप शांतता पसरते. त्यांच्या आठवणी खूप असतात.

नंतर दहावी, बारावी आणि पदवीचे शिक्षण झाल्यावरही असे निरोपाचे क्षणही वाट्याला येतात. तेही अनुभव प्रत्येकाचे वेगळे असतात. या वयात मित्र, मैत्रिणींना सोडून जातानाचे प्रत्येकाचे अनुभव हे आपापल्या असणाऱ्‍या मित्रत्वावर अवलंबून असतात. लग्नानंतर मुलीला माहेरची माणसं सोडून सासरी यावं लागतं. आताच्या काळात तरी सासरची सर्व मंडळी ओळखीची झालेली असतात. पण पूर्वी असं नव्हतं.

संपूर्णतः नवीन माणसं असायची. आपलं मन, भावना जपणारं एक जरी माणूस सासरी असलं, की हायसं वाटायचं. आपल्या जिवाभावाचं माहेर सोडताना प्रत्येक लेकीला खूप दाटून येतं. पण बदल हा निसर्गाचा नियम आहे. आयुष्यात बदल झाला नाही तर प्रगती खुंटेल. म्हणून बदल स्वीकारणं ही काळाची गरज असते. जर एखाद्या प्रसंगात नाही बदल स्वीकारला तर, स्वतःच्या मनाची खूप मोठी हानी होत असते. म्हणून जे समोर येईल ते स्वीकारत आनंदानं जगणं खूप महत्त्वाचं आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com