दोनाचं चार

दिस सरलं. वर्ष सरली. कॅलेंडर बदलली. पंचांग बदललं. पैसं साचलं. संधी आली. भावकीतली जमीन इकाया निघाली. बोलणी झाली. व्यवहार ठरला. आणि गावगुंडी आड आली. व्यवहार मोडला. भावकीत हसं झालं. गडी इरंला पेटला.
Indian Agricultuer
Indian AgricultuerAgrowon

आटपाट नगर होतं. नगरात एक गाव होतं. गावात खंडीभर शेतकरी. त्यातला हा एक. वाईट वंगाळ वागला नाही. वहिवाट कधी मोडली नाही. जिद्द एकच. दोनाची चार एकर करायची.

Indian Agricultuer
Traditional Agriculture : शेतीतले जुने ठोकताळे आता खरे का ठरत नाहीत ?

दिस सरलं. वर्ष सरली. कॅलेंडर बदलली. पंचांग बदललं. पैसं साचलं. संधी आली. भावकीतली जमीन इकाया निघाली. बोलणी झाली. व्यवहार ठरला. आणि गावगुंडी आड आली. व्यवहार मोडला. भावकीत हसं झालं. गडी इरंला पेटला.

Indian Agricultuer
Agriculture Labors : मजूर खरंच मजेत आहेत का ?

पेटत राहीला. धगधगत राहीला. संधी पुन्हा कचाट्यात सापडली. बुडीताची जमीन. म्हतारीला भावकीनं अडवलेली. पिचवलेली. आली. म्हणे तू घेतली तर चार पैकं कमी. ठरलं. जवळचं सगळं पैसं, त्यात किडूक मिडूक इकलं, कमी पडलं तं सोसायटी काढली. भावकीच्या नाकावर टिच्चून जमिन घेतली. दोनाची चार झाली. पण...

कर्ज वाढलं. व्याज फिटंना. मॉक्कार माल केलं. तरी पैसा व्हयना. हाडाची काडं आन् जिवाचं तुणतुणं झालं. घोर लागला. कसदार गडी खंगाया लागला. पोरगं 12 वी ला. पहिल्या नंबरातला गडी. बापाचं हाल देखवना. साळत यायचं आन् रडत बसायचं. बापाला म्हनलं... मला साळा जमना आता, मी थांबतो घरी. पोराचा ढोर झाला. खेळतं पाय राबतं झालं.

पाच धा वर्ष जिवाचं रान केलं. कर्ज फे़डलं. बापाची पाठ, भावकीत थाट, शर्टाची कॉलर ताठ झाली. पोरगा मुरलाय आता ढेकळात. राबतोच आहे चार एकरात. त्याला आता नवं टारगेट खुणवतंय. चाराची आठ एकर करायची. स्वतः करपला पण आता भाऊ बहरावा म्हणून जिव काढतोय.

एक झाड वठलंय, एकाला फांद्या फुटल्यात आणि एकाला पालवी !

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com