‘पेंगॉंग लेक’ येथे झळकला ॲग्रोवनचा बॅनर

बॉलिवूड अभिनेता आमीर खानच्या ‘थ्री इडियटस्’ चित्रपटात मध्ये गाजलेल्या पेंगॉंग लेक परिसरात बुधवारी (ता.१५) ॲग्रोवनचा बॅनर फडकला.
‘पेंगॉंग लेक’ येथे झळकला ॲग्रोवनचा बॅनर
Agrowon BannerAgrowon

लेह : बॉलिवूड अभिनेता आमीर खानच्या (Aamir Khan) ‘थ्री इडियटस्’ चित्रपटात मध्ये गाजलेल्या पेंगॉंग लेक (Pengong Lake) परिसरात बुधवारी (ता.१५) ॲग्रोवनचा बॅनर (Agrowon Banner) फडकला. सकाळ माध्यम समूहातील दोन सहकारी देवेश गुप्ता (Devesh Gupta) आणि संतोष काथवटे (Sanosh Kathvate) यांनी १३,८६२ फूट उंचीवरील सुंदर अशा पेंगॉंग लेक येथे ॲग्रोवनचा बॅनर झळकावले.

श्री गुप्ता आणि काठवदे हे सध्या लेह-लडाख मोटारसायकल प्रवासात आहे. पंजाबातील राजपुरा शहरातून त्यांनी प्रवासास ८ पासून प्रारंभ केला होता. चंदीगड, मंडी (हिमाचल), कुलू, मनाली, सोलोंग व्हॅली, जुनीनर व्हॅली, केलॉंग, लेह करत ते सध्या ते पेंगॉंग लेक परिसरात पोचले आहेत. आपल्या प्रवासाबाबत बोलताना देवेश आणि संतोष म्हणाले,‘‘अत्यंत नयनरम्य आणि निसर्गाच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद देणारा हा परिसर आहे. आज आम्ही पेंगॉंग लेक परिसरात पोचलो आहोत. येथे ॲग्रोवनच्या बॅनर फडकावताना आम्हाला आनंद झाला.’’

लेह जिल्ह्यात पेंगॉंग लेक परिसर येतो. समुद्र सपाटीपासून सुमारे १३,८६२ फूट (४२२५ मिटर) उंचीवरील हा सुंदर लेक पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात. सुमारे १३४ किलोमीटर लांबी आणि ५ किलोमीटर रुंदी असलेला हा तलाव (लेक) हिवाळ्यात मात्र गोठून जातो. या तलावाची सुमारे ३३० फूट खोली आहे. थ्री इडियटस्‌ या चित्रपटानंतर येथे पर्यटकांची संख्या वाढली असून चित्रपटात दाखविलेली स्कूटर आदी येथे छायाचित्रीकरण करताना पर्यटक दिसतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com