शरद पवार यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांचा जयंती उत्सव

ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथे जयंती उत्सव मंगळवारी (ता. ३१) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे (Ahilyadevi Holkar) जन्मगाव असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथे जयंती उत्सव मंगळवारी (ता. ३१) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याकरिता आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म जामखेड तालुक्यातील चौंडी गावात ३१ मे १७२५ मध्ये झाला. दरवर्षी संपूर्ण राज्यभरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. चौंडी येथे जोरदार तयारी करून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज नेते, मंत्री आणि सर्वपक्षीय आमदार उपस्थित राहणार आहेत. यंदा निर्बंधमुक्त जयंती साजरी होत असताना त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचे दिग्गज नेते आणि राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाची नक्कीच शोभा वाढणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राज्यकर्त्या, आदर्श सामाजिक कार्यकर्त्या व दातृत्व संपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात स्वतःच्या कामाचा ठसा उमटविला. मंदिर जीर्णोधार, जलसंधारणाची कामे त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणात झाली. त्यांच्या प्रत्येक कार्यातून पिढीला प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या या कार्याचा जागर करण्यासाठी आपण जयंती उत्सवानिमित्त आगळावेगळा कार्यक्रम हाती घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com