ऐसे कैसे झाले भोंदू

बऱ्याच दिवसांनी दोघे मित्र एकमेकांना भेटले. मित्राचा नवीनच बांधलेला ‘सद्‍गुरुकृपा’ बंगला, पार्किंगमध्ये महागडी चारचाकी, गाडीवरही लिहिलेलं ‘सद्‍गुरुकृपा’. घरात भलामोठा त्याच्या सद्‍गुररूंचा फोटो.
ऐसे कैसे झाले भोंदू
मशागत लेखAgrowon

शंकर बहिरट

बऱ्याच दिवसांनी दोघे मित्र एकमेकांना भेटले. मित्राचा नवीनच बांधलेला ‘सद्‍गुरुकृपा’ बंगला, पार्किंगमध्ये महागडी चारचाकी, गाडीवरही लिहिलेलं ‘सद्‍गुरुकृपा’. घरात भलामोठा त्याच्या सद्‍गुररूंचा फोटो. वाडवडिलांनी जतन केलेली शेती विकून बंगला आणि गाडी आली यात सद्‍गुरुकृपा कशी झाली? या विचारात दुसरा मित्र पडला. हवापाण्याच्या गोष्टी झाल्या. पहिला म्हणाला, ‘‘आता फक्त आराम! काही काळजी नाही. सगळ्या चिंता सद्‍गुरूंच्या स्वाधीन. बरं, तू सध्या काय करतोस? फारच काळा पडलाय तुझा चेहरा.’’

‘‘मी शेती करतो. दुधाचा जोड धंदा आहे. पोटापुरतं मिळतं. दिवसभर कामात असतो. संध्याकाळी थोडा वेळ वाचन करतो.’’ ‘‘पुस्तकात काही नसतं रे, सद्‍गुरूच्या भेटीशिवाय तुझे जीवन व्यर्थ आहे! तू माझ्याबरोबर चल, एकदा माझ्या सद्‍गुरूंचे दर्शन घे, त्यांचे चमत्कार बघ, तुझ्या इच्छेला येईल ती देणगी दे. ते पैसे सद्‍गुरू गोरगरिबांना दान करतात. घरी आल्यावर एकांतात त्यांना आर्त हाक मार! मग पाहा तुझ्यातले बदल.’’

‘‘अरे, मला रोज काम इतके असते, की तुझ्या सद्‍गुरूला भेटायला मला अजिबात वेळ नाही. माझ्या घरात अनेक लेखकांची पुस्तके आहेत. तुकाराम महाराजांची गाथा आहे, माउलींची ज्ञानेश्‍वरी आहे. ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. काही अडलं तर शेजारीच एक शिक्षक राहतात त्यांना विचारतो, तेही छान समजून सांगतात. मला जमेल तितकी जवळपासच्या गरजूंना मदतही करीत असतो. थोर विचारवंतांनी, संतांनी वेगवेगळ्या विषयांवर जीवनावश्यक लिहिलेलं वाचतोय. त्यांची पुस्तकं सतत मला उपयोगी पडतात. त्यांचे ग्रंथ हेच माझे सद्‍गुरू! कुठल्यातरी भोंदू सद्‍गुरूच्या शोधात दूर भटकत जायची मला आवश्यकता नाही. जमलं तर तुही चांगल्या पुस्तकांचे वाचन कर. मेंढरासारखा कुठल्याही सद्‍गुरूच्या नादी लागून आयुष्य वाया घालवू नकोस.’’

असा हा दोन मित्रांच्या भेटीत घडलेला संवाद. सध्याच्या काळात अनेक स्वयंघोषित गुरू, बाबा, बुवा यांचे स्तोम माजले आहे. आपल्याला जन्म देणाऱ्या, जीवनमूल्ये शिकवणाऱ्या मातापित्यांऐवजी हे लोक भोंदू बाबा-बुवांना पूज्य मानतात. हे भोंदू बाबा माणसाला रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचा देवधर्म, अध्यात्माच्या नावाखाली बाजार मांडतात. पैसेवाले आणि राजकीय लोकांना हाताशी धरून देणगी स्वरूपात मिळालेल्या गडगंज पैशावर भोगविलासी आयुष्य जगतात. जादूगारासारखे चमत्कार दाखवून लोकांना ते दैवी सिद्धपुरुष असल्याचे भासवतात. हे भोंदू आपले काहीही भलं करीत नाहीत. उलट अंधश्रद्धा वाढीस लावतात. लोकांचा स्वकर्तृत्वावरचा विश्‍वास उडतो.

तुकाराम महाराज म्हणतात.

ऐसे कैसे झाले भोंदू ।

कर्म करोनि म्हणति साधू ॥

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com