आकाशाचा अतिथी श्रावण

हिरव्या रंगातल्या अनेक छटा याच महिन्यात अनुभवण्यास मिळतात. या महिन्यात आवर्जून या हिरवाईचं रूप पाहायला सगळे निसर्गरम्य ठिकाणीच जातात असं नाही तर अनेक जण जवळच्याच एखाद्या डोंगरावर जाऊन श्रावणसरी अनुभवतात.
मशागत लेख
मशागत लेखAgrowon

आकाशाचा अतिथी, आला श्रावण श्रावण...

त्याच्या सुंदर पोतडीत सप्तरंगी तोरण...

कवयित्री प्रणाली महाशब्दे यांच्या या ओळी मनाला भावतात. श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटले जाते. या महिन्यातलं नैसर्गिक सौंदर्य सगळ्या दिशांनी खुलून आलेलं असतं. आकाशात निळ्या रंगाच्या विविध छटा पाहिल्या, की मन प्रसन्न होतं. निसर्गातली हिरवी हिरवाई मनाला मोहून टाकणारी असते.

मशागत लेख
पिकाला विद्राव्य खते कशी द्याल?

हिरव्या रंगातल्या अनेक छटा याच महिन्यात अनुभवण्यास मिळतात. या महिन्यात आवर्जून या हिरवाईचं रूप पाहायला सगळे निसर्गरम्य ठिकाणीच जातात असं नाही तर अनेक जण जवळच्याच एखाद्या डोंगरावर जाऊन श्रावणसरी अनुभवतात. श्रावणसरींची शेतकरी बांधवही वाट पाहत असतात. कारण मोठ्या कष्टाने पेरलेली पिकं याच महिन्यात डोलताना दिसतात. सगळ्या वेली, पाने, फुले खूप टवटवीत झालेले असतात. दुरून दिसणाऱ्या डोंगरांनी तर हिरवी शालच जणू पांघरलीय असे भासते. पक्ष्यांचा वावर मुक्तपणे चालू असतो. या महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते. प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे.

श्रावणात मंगळागौरी पूजन, नागपंचमी, मोहरम, रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा) स्वातंत्र्य दिन, पतेती, श्रीकृष्णाष्टमी आणि श्रावणी पोळा अशा सणांची रेलचेल असते.

मशागत लेख
Soybean : देशात सोयाबीन पेरणी घटली?

लेक येई गं माहेरा नागपंचमीच्या सणा

झोक्याच्या गं हिंदोळ्यावर सासर माहेर झुलत

मनी आशा आकांक्षेचा खेळ बाई रंगत

लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी नागपंचमी निमित्त माहेरी येते. तिचं ते माहेरपण तिला मनोमन सुखावणारं असतं.

ती सासर अन् माहेराला तिच्यातल्या वात्सल्यानं एकत्र बांधून ठेवत असते. पूर्वीच्या सण परंपरा आणि सध्याची सण परंपरा यात कालपरत्वे बदल होतोय. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलींना माहेरच्यांना पाहता येतं, बोलता येतं. नोकरीमुळे किंवा मुलांच्या शिक्षणामुळे असं सणावाराला माहेरी जाणं-येणं यात पूर्वीच्या मानाने बदल होतोय. माहेरची ओढ तितकीच असते प्रत्येक लेकीला आणि या श्रावणातल्या सणांबद्दल प्रत्येक मुलगी मनापासून कृतज्ञ असते. कारण या निमित्ताने तिला चार दिवस राहता येतं. मनातला आनंद, दुःख माहेरच्यांशी मनमोकळं बोलून ती पुन्हा नव्या उत्साहाने सासरी येते.

श्रावण महिन्याला अनेक कवींनी सुंदर सुंदर ओळींमध्ये शब्दबद्ध केलं आहे.

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. या महिन्यात घरातले अन्नपदार्थांची नवनवीन चव चाखायला मिळत असते. ऋतूनुसार आहारशास्त्राला आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com