Water Supply Scheme : पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करणार :देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांच्या हस्ते केंद्रशासन पुरस्कृत जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत नागपूर जिल्ह्यातील २३५ कोटी खर्चाच्या ३७२ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथे करण्यात आले.
Water Supply Scheme
Water Supply SchemeAgrowon

Nagpur News : जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना (Water Supply Scheme) सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी लवकरच ७१ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिली.

फडणवीस यांच्या हस्ते केंद्रशासन पुरस्कृत जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत नागपूर जिल्ह्यातील २३५ कोटी खर्चाच्या ३७२ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथे करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, सुनिल केदार, आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, सहपोलिस आयुक्त अश्वथी दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सीईओ सौम्या शर्मा यावेळी उपस्थित होते.

Water Supply Scheme
Water Supply Scheme : पाणीपुरवठ्याच्या योजनांकडे थकले ७८ कोटींचे वीजबिल

उपमुख्यमंत्री म्हणाले, की पाणी पुरवठ्याच्या योजना सौर उर्जेवर कार्यान्वित केल्यामुळे नैसर्गिक उर्जेचा वापर होईल. तसेच ग्रामपंचायतीकडे विजेचे देयक थकीत झाल्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची शक्यता राहणार नाही.

‘हर घर जल’ योजनेद्वारे गावातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर एकूण १३२२ पाणी पुरवठा योजनांसाठी केंद्रशासनाने आतापर्यंत ५७८ कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत.

२०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोचवून ‘हंडामुक्त’ समाज करण्याचा प्रयत्न ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून करण्यात येत, असल्याचे ते म्हणाले.

मंजुरी मिळालेल्या पाणीपुरवठा योजना...

नागपूर जिल्ह्यातील ९४ टक्के नळजोडण्या पूर्ण झाल्या आहेत. भूमीपूजन करण्यात आलेल्या एकूण ३७२ पाणीपुरवठा योजनांमध्ये पंचायत समिती काटोल ३९, नरखेड १९, रामटेक ४५, पारशिवनी ४०, कळमेश्वर ३३, सावनेर ५५, भिवापूर २१, उमरेड १९, कुही २५, मौदा २७, हिंगणा २९, कामठी २ आणि नागपूर ग्रामीणच्या १८ योजनांचा समावेश आहे.

या सर्व योजनांची अंदाजपत्रकीय किंमत एकूण २३५ कोटी ३४ लक्ष असल्याची माहिती सौम्या शर्मा यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com