रत्नागिरीत ॲमेझॉनचे आंबा संकलन केंद्र

ॲमेझॉन ही ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आता हापूस आंब्याच्या विक्रीत उतरली आहे. कंपनीने रत्नागिरी येथे पहिले आंबा संकलन केंद्र उभारले आहे. या केंद्रात शेतकऱ्यांच्या आंब्याला रास्त दर मिळेल आणि त्यांना त्वरीत पैसे दिले जातील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला.
Ratnagiri Alphonso
Ratnagiri AlphonsoAgrowon

ॲमेझॉन ही ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आता हापूस आंब्याच्या विक्रीत उतरली आहे. ॲमेझॉन रिटेल इंडिया कंपनीने कोकणात शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी सुरू केली. कंपनीने रत्नागिरी येथे पहिले आंबा संकलन केंद्र उभारले आहे.

या केंद्रात शेतकऱ्यांच्या आंब्याला रास्त दर मिळेल आणि त्यांना त्वरीत पैसे दिले जातील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला. शेतकऱ्यांना शेतीसंबंधी तांत्रिक मार्गदर्शनही केले जाणार आहे, असेही कंपनीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

रत्नागिरी येथील आंबा संकलन केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना रत्नागिरी हापूस (Ratnagiri Alphonso), देवगड हापूस (Devghad Alphonso), सेंद्रिय हापूस (Organic Alphonso) आणि केसर आंबे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Ratnagiri Alphonso
ड्रोन फवारणीसाठी ४७७ कीडनाशकांना केंद्रांची मंजुरी

या संकलन केंद्रात आंब्याच्या साठवणुकीसाठी तापमान नियंत्रित व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वेगवेगळ्या टप्प्यात या आंब्यांची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणाही या ठिकाणी आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

रत्नागिरी संकलन केंद्रात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले आंबे नंतर प्रक्रिया केंद्रात पाठवण्यात येतील. तिथे त्यांचे सॉर्टिंग आणि प्रतवारी (ग्रेडींग) करून व्यवस्थित पॅकिंग करण्यात येणार आहे. ``शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच रास्त दर मिळावा आणि लगेचच पैसे मिळावेत, हा आमचा प्रमुख हेतू आहे. तसेच ग्राहकांनी उत्तम दर्जाचे आंबे घरपोच मिळावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,`` असे ॲमेझॉनचे वरिष्ठ अधिकारी राजेश प्रसाद म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com