Agriculture Loan- सहकारी बँकांनी सिंचनासाठी कर्ज द्यावे: अमित शाह

सहकारी बँकांना (Cooperative banks) कृषी क्षेत्रासाठी वित्त पुरवठ्याचे आवाहन करताना शाह (Amit Shah) यांनी, सिंचन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीची कर्ज द्यावीत, असे आवाहन केले.
Amit Shah
Amit ShahAgrowon

सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी कर्ज द्यावे, असे मत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केले. कृषी क्षेत्रात सुधारणा झाल्याशिवाय शेतकऱ्यांचं उत्पन्नात वाढणार नाही, असे ते म्हणाले. नॅशनल को-ऑपरेटिव्ह ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बॅंक्स फेडरेशनतर्फे (NAFCARD) नुकतीच कृषी व ग्रामीण विकास बँकांची (ARDBs) राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शाह बोलत होते.

सहकारी बँकांना (Cooperative banks) कृषी क्षेत्रासाठी वित्त पुरवठ्याचे (Agriculture Loan) आवाहन करताना शाह यांनी, सिंचन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीची कर्ज द्यावीत, असे आवाहन केले.

Amit Shah
Basmati Export: पंजाबमधील बासमती उत्पादक शेतकरी चिंतेत

आजवर कृषी व ग्रामीण विकास बँकांनी ३ लाखांहून अधिक ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज पुरवठा केलेला आहे. या बँकांनी ८ कोटी ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवायला हवे. त्याचबरोबर कृषी व सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाचे प्रमाणही वाढवायला हवे, असे शाह म्हणाले.

शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीची कर्ज देण्यासाठी कृषी व ग्रामविकास बँकांनी नियमावलीत सुधारणा कराव्यात. या सुधारणा करताना त्या बॅंककेंद्रीत न राहता संपूर्ण क्षेत्राचा विचार करून राबवाव्यात, असा आग्रह शाह यांनी धरला. तसेच या सुधारणा राबवण्यासाठी नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटला (NABARD) एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली.

Amit Shah
Basmati export : बासमती निर्यात दरात विक्रमी वाढ

दरम्यान सहकारमंत्री शाह यांचा हेतू चांगला असला तरी कृषी क्षेत्रासाठी कर्जपुरवठा करणे सहकारी बँकांसाठी सोपे नाही. सहकारी बँकांची रचनाच अशी आहे की, इथे थकीत कर्जाची जबाबदारी संचालक स्तरावर घ्यायला कोणी तयार होत नाही, असे नाबार्डचे (NABARD) अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांनी यावेळी सांगितले. दीर्घ मुदतीच्या कर्जवसुलीसाठी राज्य पातळीवर राजकीय प्रभाव टाकला जात असल्याचा मुद्दाही चिंताला यांनी शाह यांच्या निदर्शनास आणून दिला.

यावर शाह यांनी, कृषी क्षेत्राला दीर्घ मुदतीसाठी कर्जपुरवठा करण्यातील अडचणी मान्य आहेत, मात्र या अडचणींवर मात करून कृषी क्षेत्राचा विकास करण्याची गरज व्यक्त केली. कृषी व ग्रामविकास बँका वेगवेगळ्या नावाने देशात मागच्या ९ दशकांपासून कार्यरत आहेत. जमिनीच्या मोबदल्यात या बँका कर्ज पुरवतात. १९२४ साली प्रथम बॅंकेने शेतकऱ्याला दीर्घ मुदतीचे कर्ज दिले असल्याचा दाखला आहे. दीर्घमुदतीचे कर्ज दिल्याचे एवढे जुने उदाहरण असताना नंतरच्या काळात दीर्घ मुदतीसाठी कर्जपुरवठ्याचे प्रमाण वाढलेले दिसत नसल्याचे शाह म्हणाले.

याखेरीज सहकारी बँकिंग क्षेत्राने पोल्ट्री, फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय , सिंचनासारख्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आपल्याला केवळ बँक चालवायच्या नाहीत, तर ज्या हेतूने सहकारी बँक स्थापन झाल्या ते हेतूही सिद्धीस न्यायचे आहेत, असे शाह यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com