APMC Election : बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग वाढली

कोरोना संक्रमणामुळे बाजार समितीच्या निवडणुका दोन वर्षे होऊ शकल्या नाहीत. सातत्याने संचालक मंडळास मुदतवाढ मिळत गेली.
APMC Election
APMC ElectionAgrowon

Amravati APMC News : बाजार समितीच्या निवडणुकांची (APMC Election) लगीनघाई सुरू झाली आहे. प्रतीक्षेत असलेल्या मतदारयादी (Voter List) तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

अंतिम मतदारयादी २० मार्चला जाहीर करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील दहा बाजार समितीच्या निवडणुका प्रस्तावित आहेत.

कोरोना संक्रमणामुळे बाजार समितीच्या निवडणुका दोन वर्षे होऊ शकल्या नाहीत. सातत्याने संचालक मंडळास मुदतवाढ मिळत गेली. दरम्यान, राज्य सहकारी प्राधिकरणाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता.

मात्र मतदारयादीत ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थांच्या जुन्याच मतदारांना समाविष्ट करण्यात आल्याने आक्षेप घेण्यात आले होते.

APMC Election
Pune APMC Election : बाजार समिती निवडणुकांच्या मतदार याद्यांचा घोळ कायम

उच्च न्यायालयात यासंदर्भात आव्हान याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने नवीन सदस्यांना मतदारयादीत समाविष्ट करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नव्याने मतदारयादी तयार करण्यात येणार आहे.

राज्य सहकारी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदारयादी तयार करण्यासाठी १ सप्टेंबर २०२२ हा अर्हता दिनांक निश्‍चित केला होता, मात्र त्यानंतर ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्यात.

त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांना मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी १० फेब्रुवारीपासून अंतिम मतदारयादी सुधारणा कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याने या सदस्यांना आता मतदारयादीत स्थान मिळणार आहे.

या बाजार समितीत उडणार रणधुमाळी

जिल्ह्यातील अमरावती, अचलपूर, नांदगाव खंडेश्‍वर, धामणगावरेल्वे, चांदूररेल्वे, मोर्शी, वरुड, दर्यापूर, अंजनगावसुर्जी व अचलपूर या दहा बाजार समित्यांत निवडणुकांची रणधुमाळी उडणार आहे.

APMC Election
APMC Election : बाजार समिती मतदार यादीतील सुधारणांना आक्षेप नाहीच!

...असा आहे मतदारयादीचा कार्यक्रम

अंतिम मतदारयादीत सुधारणा : १० ते २४ फेब्रुवारी

प्रारूप मतदारयादी : २७ फेब्रुवारी

आक्षेप व हरकती : २७ फेब्रुवारी ते ८ मार्च

सुनावणी : ८ ते १७ मार्च

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : २० मार्च

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com