Watermelon Cultivation : तेल्हारा तालुक्यातील अनंता इंगळे यांनी केलंय कलिंगड लागवडीचे योग्य नियोजन

अनंता इंगळे यांचे कलिंगडाचे पीक आता जवळपास ४० दिवसांचे झाले आहे. त्यामुळे कलिंगडाला सुरू असलेले १२.६१.० हे खत गेल्या १० दिवसांत बंद केले आहे.
Watermelon Cultivation
Watermelon CultivationAgrowon

नाव : अनंता भिकाजी इंगळे

गाव : चितलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला

एकूण शेती : ५० एकर

कलिंगड लागवड : १५ एकर

Akola Agriculture News : अनंता इंगळे यांचे कलिंगडाचे पीक आता जवळपास ४० दिवसांचे झाले आहे. त्यामुळे कलिंगडाला सुरू असलेले १२.६१.० हे खत गेल्या १० दिवसांत बंद केले आहे. त्याऐवजी वाढीच्या पुढील अवस्थेत उपयुक्त १३.४०.१३ हे खत सुरू केले आहे.

कारण फुलांचे फळात रूपांतर होत असताना फळाचे आकारमान लांब व गोल होण्यासाठी १३.४०.१३ हे खूप महत्त्वाचे ठरते. त्यानंतर आठवड्यातून एक दिवस कॅल्शिअम नायट्रेट पाच किलो प्रति एकर दिले. सोबत बोरॉन ११ किलो दिले. मॅग्नेशिअम सल्फेट आठवड्यातून एकदा पाच किलो प्रति एकर दिले.

पुढे फळांचा आकार पाव किलो ते अर्धा किलोपर्यंत झाला, की १३.४०.१३ सोबत ०.५२.३४ हेही खत सुरू केले. सध्या कलिंगडाचा प्लॉट ४० दिवसांचा झाला आहे. ही खते पुढे ५५ दिवसांपर्यंत सुरू ठेवणार आहे. पुढे ५५ दिवसांनंतर पुढील पाच दिवस १३.०.४३ हे खत दिले जाईल. साधारणतः ६० दिवसांत प्लॉट काढणीस तयार होईल.

पिकांच्या व्यवस्थापनासोबतच बाजाराच्या स्थितीवरही लक्ष ठेवत आहे. सध्या बाजारातील कलिंगडाची आवक कमी होत आहे. त्यावरून पुढील टप्प्‍यात मालाला चांगले दर मिळू शकतात. व्यापाऱ्याकडून मालाबाबत विचारणा होऊ लागली आहे.

आता रमजान महिना संपत आला आहे. रमजाननंतर बाजार सुरू होईल, तोपर्यंत मे महिना हा उष्णतेचा असतो. या काळात कलिंगडाची मागणी वाढते, हा दरवर्षीचा अनुभव आहे. या वर्षी काय होते, ते पाहायचे.

Watermelon Cultivation
Watermelon Crop Damage : पातुर्ड्यात सात एकरातील खरबूज पिकाचे नुकसान

विशेष बाब

कलिंगड पिकात एप्रिलमध्ये केळीची आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. एकाच खर्चात, व्यवस्थापनात दोन्ही पिकांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करता येईल.

पाणी नियोजन

कलिंगडाचे पीक आता जवळपास ४० दिवसांचे झाले आहे. फळे चांगल्या पद्धतीने पोसायला लागली आहेत. म्हणून फळे जसजशी मोठी होत आहेत, तसतसे पाणी द्यायचे प्रमाण वाढवावे लागते. दुसरीकडे दिवसाचे उष्णतामानही खूप आहे. त्यामुळेही पाण्याची गरज वाढते. त्यानुसार पाण्याचे नियोजन सुरू केले आहे.

कीड-रोग नियंत्रण

आमच्या भागात सात व आठ एप्रिलला पाऊस झाला होता. त्यामुळे कलिंगड पिकावर डाऊनी मिल्ड्यू सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेतली.

तसेच मर रोग येऊ नये म्हणून ताम्रयुक्त बुरशीनाशकांची एक आळवणीही केली. हे द्रावण ठिबकद्वारे सोडले. सध्यातरी किडीचा फारसा प्रादुर्भाव दिसत नाही.

मात्र कीड, अळी यावरही लक्ष ठेवून आहे. आवश्यकता भासल्यास फवारणीचे नियोजन केले जाईल.

संपर्क - अनंता इंगळे, ७९७२३६९७६७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com