Drone Technology : आंध्रप्रदेश सरकार २ हजार ड्रोनचे करणार वाटप

राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये खते आणि बियाण्याचा तुटवडा होऊ देऊ नका. त्यासाठी रायथू भरोसा केंद्राछाया माध्यमातून बियाणे खत पुरवठा करण्यास प्राधान्य द्या, अशा सूचनाही मुख्यमंत्री रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Drone technology for agricultural planning
Drone technology for agricultural planning

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या आंध्रप्रदेश सरकारने (Andhrapradesh) भाताच्या खरेदीसाठी (Paddy) १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. आणि कमी प्रतवारीचे धान्य खरेदी करणार आहे. तसेच शेतकऱ्यांना २ हजार ड्रोनचे वाटप (Drone) करण्याची माहिती मुख्यमंत्री वाय.एस जगन मोहन रेड्डी ( Y S Jagan Mohan Reddy) यांनी दिली. त्यांनी बुधवारी (ता.१८) राज्यातील अधिकाऱ्यांसोबत कृषी आढावा बैठक घेतली. या बैठकीत रेड्डी बोलत होते.

यावेळी मंत्री काकानी गोवर्धन रेड्डी, करूमुरी व्यंकट नागेश्वर राव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आंध्रप्रदेश राज्य सरकार शेतकऱ्यांना ड्रोन प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये खते आणि बियाण्याचा तुटवडा होऊ देऊ नका. त्यासाठी रायथू भरोसा केंद्राछाया माध्यमातून बियाणे खत पुरवठा करण्यास प्राधान्य द्या, अशा सूचनाही मुख्यमंत्री रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Drone technology for agricultural planning
Rayatu bandhu : तेलंगणा सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी मदत

आंध्रप्रदेश राज्य सरकारने 'रायथू भरोसा केंद्र' स्थापन केले आहेत. या केंद्रातून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा पुरवल्या जातात. आणि शेतमाल खरेदी केली जाते. तसेच आंध्रप्रदेश सरकार ड्रोनसाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्यासाठी योजना आखत असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ड्रोन आणि कृषी अवजारांचे वाटप मार्च, मे आणि जूनमध्ये केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० ड्रोनचे वाटप करणार आहोत. तसेच एकूण २ हजार ड्रोनचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.

दरम्यान, 2023 हे मिलेट्स वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासंबंधी मिलेटस वाटपासाठी योजना सुरू करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com