Anganwadi Servant Recruitment : अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती सुरू

महिन्यातून एकदा मुलांचे वजन, दररोज अंगणवाडी उघडल्याची वेळ, आहार किती दिला, यासंबंधीची माहिती मराठीतूनच भरता येईल.
Anganwadi Sevika Samp
Anganwadi Sevika SampAgrowon

Solapur News : जिल्ह्यातील अंगणवाड्यांवरील १८६ सेविका व जवळपास ७५० मदतनीस पदांची भरती ३० एप्रिलपर्यंत केली जात आहे. सांगोला, कोळा, करमाळा तालुक्यातील पदभरतीसाठी २५ मार्चपर्यंत तर सोलापूर शहर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट येथील पदभरतीसाठी २१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

तसेच उर्वरित तालुक्यातील भरती प्रक्रिया १५ मार्चपासून सुरु होणार असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ५ एप्रिलपर्यंत मुदत असणार आहे.

सोलापूर, बार्शी नागरी प्रकल्प आणि सोलापूर-अक्कलकोट नागरी प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. विजय खोमणे यांच्या सोलापुरातील अंत्रोळीकर नगरातील आर्किटेक कॉलेजशेजारील कार्यालयाकडे संबंधित उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

Anganwadi Sevika Samp
Anganwadi Sevika Strike : अंगणवाडी सेविका संपामुळे बालके आहारापासून वंचित

तर पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, सांगोला या तालुक्यांच्या शहरी भागातील महिला उमेदवारांना पंढरपूर शहरातील बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा पाटील यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागेल.

शहरातील प्रकल्प एकअंतर्गतचे अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव यांच्या सुपर मार्केटवरील कार्यालयात अर्ज करावे लागतील.

दरम्यान, सोलापूर, पंढरपूर व बार्शी येथील काही शहरी भागाचे अर्ज नागरी प्रकल्प-दोन कार्यालय, रंगभवन ख्रिश्चन हौसिंग सोसायटी येथे अर्ज करावे लागतील. http//solapur.gov.in या संकेतस्थळावर भरतीची संपूर्ण माहिती व अर्ज उपलब्ध आहे.

त्यावरून अर्ज डाऊनलोड करून त्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित बालविकास अधिकारी कार्यालयात मुदतीत तो जमा करायचा आहे.

Anganwadi Sevika Samp
जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी इमारतीसाठी निधी मंजूर

मराठीतूनच भरता येईल ‘पोषण ट्रॅकर’ची माहिती

बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना आता ‘पोषण ट्रॅकर’वरील माहिती मराठीतूनच भरण्याची सोय उपलब्ध आहे. मुलाची नोंदणी करताना सुरवातीला आधारकार्डवरून त्याचे नाव इंग्रजीत भरावे लागेल.

त्यानंतर महिन्यातून एकदा मुलांचे वजन, दररोज अंगणवाडी उघडल्याची वेळ, आहार किती दिला, यासंबंधीची माहिती मराठीतूनच भरता येईल.

नवीन शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये तर मदतीस महिलेला साडेपाच हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. ‘पोषण ट्रॅकर’वरील माहिती अचूक भरल्यास सेविकेला ५०० रुपये तर मदतनीस महिलेला २५० रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com